
पुणे येथे बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल व 2 जिवंत काडतुसे असा 25 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शुभम रवींद्र पाटोळे (22, रा. पर्वती पायथा) असे अटक करण्यात आलेल्याचे सराईताचे नाव आहे.
दत्तवाडी पोलिसांकडून गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी हद्दीत गस्त घातली जात आहे. तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना एक सराईत जनता वसाहत परिसरात पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले आणि कुंदन शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून शुभम पाटोळे याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडील पिस्तुल व काडतुसे जप्त करण्यात आले आहे. त्याने पिस्तुल कोठून आणले आहे. पिस्तुलाचा वापर तो कशासाठी करणार होता, याचा तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोेलीस निरीक्षक विजय खोमणे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, राजू जाधव, महेश गाढवे, अक्षयकुमार वाबळे, अमित सुर्वे, शरद राउत, शिवाजी क्षीरसागर, राहूल ओलेकर, प्रमोद भोसले, विष्णू सुतार नावनाथ भोसले यांच्या पथकाने केली.































































