दागिना महाराष्ट्राचा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • मीना आंबेरकर

आज गुढीपाडवा… निसर्गातील समृद्धतेचा… नवतेचा सोहळा. निसर्गाचे अमूल्य वैभव महाराष्ट्राच्या अंगोपांग विसावलंय, पण त्याचबरोबर सोन्या–मोत्याच्या–हिऱयाच्या वैभवानेही आपण समृद्ध आहोत. वैभवसंपन्न आहोत.

नखशिखांत दागिन्यांची ही सोनेरी, रुपेरी परंपरा. आपले वैभव, खानदानी श्रीमंती दाखविणारी. प्रत्येकाच्याच घरात हे ऐश्वर्य असावं. पण हा चैत्र सोहळा निसर्गाचं अपरिमित वैभव दरवर्षी आपल्यासाठी रितं करीत असतो. अनंत हस्ते आपल्यावर उधळत असतो. ते या सुवर्णालंकारांहून अधिक मौल्यवान आहे. कारण सोनं जरी महाग असलं, तरी ते पुन्हा घडवता येईल. खरेदी करता येईल, पण निसर्गाने जर हात आखडता घेतला तर हे चैत्रवैभव कुणाकडे मागायचे…

दागदागिने… आभूषणे… अलंकार. गुढीपाडवा… नव्याची… समृद्धीची सोन्याची चाहूल घेऊन येणारा हा सोन्याचा सोहळा अनेक रुपात अवतरतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर चेन्नई, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, बंगाल, कश्मीरमध्येही हे नववर्षच असते. वरील प्रत्येक प्रांतात या नववर्षाचे स्वागत घरादाराची स्वच्छता, दारापुढे रांगोळी, चिंच, कडुनिंबाची पाने, गूळ, मीठ, कैरी या ऋतुमानानुसार ताज्या, मधुर पदार्थांचे मिश्रण प्रांतानुसार वेगवेगळय़ा पद्धतीने केले जाते. आपल्याकडील पन्हं, आंब्याची डाळ… कर्नाटकात पचडी होते. प्रत्येक ठिकाणच्या चालीरिती, खाद्यपदार्थ थोडय़ाफार फरकाने सारखे, वेगळे असले, तरी प्रत्येक प्रांतात एक गोष्ट मात्र अगदी समान असते. समृद्धीचे प्रतीक असलेला दागिना. किमान एकातरी सुवर्णालंकाराची पूजा पाडव्याfिनमित्ताने केली जाते. आपल्या महाराष्ट्राची अलंकारांची परंपरा तर अतिप्राचीन आहे. अगदी शिवकालापासून हे दागिने वैशिष्टय़पूर्ण ठरले आहेत. येथेही पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण स्वतःची वैशिष्टय़े राखून आहेत. चिंचपेटी, कोल्हापुरी साज, पुतळीमाळ हे दागिने देशावर प्रांतात घातले जातात. तर कोकण त्यामानाने परिस्थितीनुसार केवळ नथीवर समाधान मानणारे.

  • चिंचपेटी – ही पोकळ सोन्याच्या पेटीने बनवलेली असते.
  • ठुशी – म्हणजे ठासून भरलेले गोल मणी. हा प्रकार राजघराण्यात खूप प्रसिद्ध होता.
  • लफ्फा – या अलंकारावर मुस्लिम घडणावळीचा प्रभाव आहे. हाराच्या बारीक तारा टोचू नयेत म्हणून मागच्या बाजूस रेशमी गादी लावलेली असते.
  • पुतळी आणि गाठला – पुतळी माळ सतराव्या शतकापासून प्रचलित आहे. यावर लक्ष्मीची प्रतिमा असते.
  • कोल्हापुरी साज – अनेक स्त्रियांनी साजश्रृंगारासाठी धारण केलेला अलंकार म्हणून साज. यात मासा, कमळ, कारले, शंख, बेलपान, नाग, कासव, भुंगा असे शुभ आकार आणि मणी सोन्याच्या तारेत गुंफलेले असतात.
  • मोहनमाळ – मुशीत घडवलेल्या मण्यांची माळ.
  • गोफ – सुरेख विणीच्या सोन्याच्या नाजूक तारांचा दोर. गोकुळाष्टमीला खेळल्या जाणाऱया खेळातील भरगच्च वेणीवरून त्याच बनावटीच्या दागिन्याला हे नाव मिळाले.
  • तन्मणी – मोत्याच्या अनेक सरांमध्ये गुंफलेले हिऱयाचे खोड.
  • अंबर माळ – अंबर हे एक खनिज असून त्याचे मणी बनवून त्यांची माळ पुरुषही गळय़ात घालतात. मराठा राजवटीत याला ‘आमरसा’ म्हणत.
  • काशीताळी – महाराष्ट्रातील सारस्वत ज्ञातीतील हे मंगळसूत्र काशीताळी म्हणून ओळखले जाते. यात सोन्याचे आणि पोवळय़ाचे मणी ओवलेले असून मुख्य पदकाला ताळी म्हणतात. गोव्यात हिंदूंप्रमाणे ख्रिश्चन स्त्रियाही हा अलंकार सौभाग्यचिन्ह म्हणून वापरतात.
    नासिका अलंकार
    नाक टोचण्याची परंपरा आपल्याकडे नव्हती. ही प्रथा गेल्या काही हजार वर्षांपासून आपल्याकडे सुरू झाली. हा अलंकार मुस्लिम धर्मातून आपल्याकडे आलेला आहे.
  • नथ- अस्सल मराठमोळा अलंकार. पाणीदार मोती, माणिक, पाचू यांची सुबक उधळण म्हणजे नथ. प्रत्येक समाजात नथीची घडणावळ वेगळी असते.
  • बुलाक – हा हिंदुस्थानबाहेरचा, प्राचीन मध्य आशियाई अलंकार. नाकाच्या मध्यभागी हा घातला जातो. महाराष्ट्रातील मुस्लिम स्त्रिया हा घालतात.
    पायातील अलंकार
  • पैंजण, साखळय़ा – मूळ शब्द अंदू. हा कानडी शब्द आहे. हत्तीच्या पायातील भक्कम साखळीला अंदू म्हणतात. शिवकालात आणि पेशवाईत हा शब्द मागे पडून साखळय़ा हा शब्द रुजला.
  • तोरडय़ा – हा संस्कृत शब्द आहे. पैंजण हा पर्शियन भाषेतील शब्द असून मुस्लिम अतिक्रमणासोबत तो महाराष्ट्रात आला.
  • जोडवी – महाराष्ट्रातील महत्त्वाचे सौभाग्यचिन्ह जोडवी मधल्या बोटात तर मासोळी, विरवल्या तिसऱया बोटात कुमारिकाही घालतात.
    कर्णभूषण
    कुडी – मोत्याची, हिऱयाची सुबक कुडी. म्हणजे खानदानी तेजाचे, समृद्धीचे प्रतीक. आपल्या घरातील आजींच्या कानात अजूनही कुडय़ा हमखास सापडतील. z कान – भरगच्च सोन्याच्या अंगावर हिरेमोत्यांनी मढलेले कान संपूर्ण चेहऱयाची शोभा वाढवतात.
    भुजालंकार
    बाजूबंद, ताळेबंद, हातात बांगडय़ा, कंगन, पाटल्या हे अस्सल पूर्ण सोन्याचे घसघशीत दागिने.
    अंगठीच्या मध्यभागी छोटीशी डबी त्यावर आरसा. प्राचीन काळी स्त्रिया ही अंगठी स्वसुरक्षेसाठी वापरत. त्यात विष असे.

[email protected]