लेख – मणिपूरमध्ये दहशतवादाचे पुनरुज्जीवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

ईशान्य हिंदुस्थानातल्या दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे, परंतु चीन दहशतवाद पुन्हा पुनरुज्जीवन करण्याकरिता वेगवेगळ्या दहशतवादी गटांना मदत करून त्यांना हिंसक कृत्ये वाढवण्यास भाग पडत आहे. म्हणून हा हल्ला झाला असावा. लडाखमध्ये चीन आक्रमक झाल्यानंतर हिंदुस्थानी सैन्याने ईशान्य हिंदुस्थानात दहशतवादविरोधी अभियानामध्ये तैनात असलेल्या दोन डिव्हिजन्सना तिथून हलवून, चीन सीमेवर आपले डिफेन्स मजबूत करण्याकरिता पाठवले आहे. यामुळे लढाई झाल्यास चीनला आपण अतिशय चांगले प्रत्युत्तर देऊ शकतो. चीन अर्थातच या सैन्याला मागे आणण्याकरिता दहशतवाद वाढवत आहे.

मणिपूरमध्ये शनिवारी आसाम रायफल्सच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी आणि चार जवान शहीद झाले. या हल्ल्यात कर्नल त्रिपाठी यांची पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी पीपल्स लिबरेशन फ्रंट आणि मणिपूर नागा पीपल्स फ्रंट या दहशतवादी संघटनांनी घेतली आहे. 1978 मध्ये अस्तित्वात आलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीने यापूर्वीही असे हल्ले केले आहेत, मात्र शनिवारचा हल्ला हा आतापर्यंतचा सर्वात प्राणघातक आहे. ही दहशतवादी संघटना तस्करी आणि खंडणी गोळ्या करण्यात गुंतली आहे. अनेक रस्त्यांवर टोल नाके लावून ते वसूल करतात.

1981 मध्ये एन. बिशेश्वर सिंगच्या अटकेनंतर व 1982 मध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीचे प्रमुख थोडम कुंजबेहारी यांच्या मृत्यूनंतर संघटना कमकुवत झाली. 1989 मध्ये या संघटनेने रेव्होल्युशनरी पीपल्स फ्रंट (RPF) नावाने स्वतःची राजकीय आघाडी स्थापन केली. त्याचे दहशतवादी मेईतेई आणि पंगल जातीचे आहेत. मणिपूरच्या लोकसंख्येपैकी सुमारे 53 टक्के लोक मेईतेई समुदायातील आहेत. आसाम, त्रिपुरा, नागालँड, मेघालय आणि मिझोरामव्यतिरिक्त हे म्यानमारमध्येही स्थायिक आहेत.

मणिपूरमधील गेल्या काही वर्षांतील हा सर्वांत मोठा हल्ला आहे. मणिपूरमध्येही अनेक दहशतवादी गट सक्रिय आहेत. एका दहशतवादी गटाने केलेल्या हल्ल्यात 2015 मध्ये 20 जवान शहीद झाले होते. सीमेवर किंवा सीमावर्ती भागांमध्ये घातपाती आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये अधिकारी, जवान शहीद होणे ही अस्वस्थ करणारी बाब आहे. कश्मीरमध्ये अशा हल्ल्यांमध्ये अनेक वेळा कुटुंबीयांना लक्ष्य केले होते. मणिपूरमधील दहशतवाद्यांनीही सीमारेषा ओलांडलेली आहे. म्हणूनच ते कृत्य संतापजनक आहे.

चीनमधून पीएलएला पैशाची रसद मिळते. पीएलएची स्थापना 25 सप्टेंबर 1978 मध्ये एन. बिशेश्वर सिंग यांच्या नेतृत्वाखाली झाली. या दहशतवाद्यांनी हिंदुस्थानात आपली संघटना बळकट करण्यासाठी चीनमधूनदेखील मोठा निधी दिला जात आहे. हिंदुस्थानने सरकारने या संघटनांना दहशतवादी संघटना घोषित केले आहे.

म्यानमार सीमेजवळ मोठे आव्हान

हा परिसर म्यानमार सीमेजवळ आहे. ही सीमा बऱयापैकी सच्छिद्र असल्यामुळे मणिपुरी बंडखोर बऱयाचदा घातपाती कारवाया करून पलीकडे पळून जातात. त्यामुळे या भागातील सुरक्षा दलांसमोर मोठे आव्हान असते.

म्यानमार लष्कराबरोबर हिंदुस्थानी लष्कराने दहशतवादीविरोधात संयुक्त कारवाया राबवल्या आहेत. तरीही तेथील सीमावर्ती भागात अनेकदा बंडखोर लपून बसतात. म्यानमारमध्ये मोठय़ा प्रमाणात चिनी बनावटीची शस्त्रs, भूसुरुंग अशी सामग्री बेकायदा आणली जाते. ही शस्त्रs ईशान्येतील बंडखोर गटांच्या हाती पडतात. 9 नोव्हेंबर रोजी मणिपूर सीमेवरील एका भागात जवळपास 250 किलोंची स्पह्टके आसाम रायफल्सने हस्तगत केली. अशाच स्वरूपाच्या स्पह्टकांचा वापर शनिवारच्या हल्ल्यात करण्यात आला होता. पीएलए आणि इतर मणिपुरी संघटना शक्यतो सुरक्षा दलांवर हल्ले करण्याचे टाळतात. त्याऐवजी स्थानिक पातळीवर खंडणी गोळा करून त्या उभ्या आहेत. पीएलएच्या राजकीय संघटनेचे नेते बांगलादेशात असतात. त्यांची काही अनधिकृत ठाणी वा तळ बांगलादेश तसेच म्यानमार सीमेवर सक्रिय आहेत.

मुद्दा ईशान्येतील सामरिक आणि सुरक्षाविषयक परिस्थितीचा आहे. येथे लष्करी विशेषाधिकार कायदा लागू आहे. आसाममधील ‘उल्फा’ चळवळीला बऱयापैकी नेस्तनाबूत केले असताना आणि नागा बंडखोरांशी चर्चेची प्रक्रिया सुरू असताना, पीपल्स लिबरेशन आर्मी आणि मणिपूर नागा पीपल्स लिबरेशन फ्रंट या गटांनी सुनियोजित हल्ला घडवून आणला.

मणिपूरमध्ये आजही वाटाघाटींऐवजी तस्करी किंवा गैर कृत्य करू यावर ठाम राहणारे काही गट आहेत. अरुणाचल सीमेवर चीनच्या आक्रमक हालचाली सुरू असताना ईशान्येतील इतर राज्यांमध्ये घातपाती हल्ले सुरू होणे धोकेदायक आहे. म्हणून या कारवायात थांबविण्याकरिता हिंदुस्थानी सेना सदैव प्रयत्न करत आहे. या गटांच्या शस्त्रधारी दहशतवाद्यांची संख्या दीडशे ते दोनशे असावी. अर्थातच ही संख्या कमी आणि जास्त होत असते. दहशतवादी हे सर्वकाdळ दहशतवादी नसतात. बाकीच्या वेळात ते तस्करी किंवा गैर कृत्य करण्यामध्ये गुंतलेले असतात.

कर्नल त्रिपाठी मणिपूरमध्ये यायच्याआधी मिझोराममध्ये तैनात होते आणि त्यांची बटालियन 46आसाम रायफलने मिझोराममध्ये तस्करी थांबवण्यामध्ये प्रचंड यश मिळवलेले होते. त्यांनी अनेक शस्त्रs आणि स्पह्टक पदार्थसुद्धा पकडले होते. तस्करी थांबल्यामुळे तिथल्या स्थानिक जनता त्यांची अतिशय आभारी होती, मात्र तस्करी करणारे तस्कर आणि बंडखोर गट हे अतिशय नाखूश होते. आसाम रायफलने केलेल्या कारवाईमुळे मे 2021 मध्ये त्यांना सैन्याच्या युनिट सायटेशन या शूरता पुरस्काराने गौरवण्यात आले होते. याचा अर्थ होतो की, त्यांच्या बटालियनने अतिशय चांगली कामगिरी बजावलेली होती. याशिवाय कोरोना काळामध्येसुद्धा त्यांनी स्थानिक जनतेला प्रचंड मदत केली होती, मात्र तस्करी थांबल्यामुळे दहशतवादी गटांनी सूड घेण्याकरिता हा हल्ला केला असावा. याशिवाय हल्ला केलेल्या दिवशी दहशतवादी संघटनेचा वर्धापन दिवस होता, म्हणून आपल्या समर्थकांचे मनोबल वाढवण्याकरिता हा हल्ला केला गेला असावा. आपल्याला पुनः पुन्हा म्यानमारमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग पॅम्पवरती सर्जिकल हल्ले करावे लागतील. चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्याकरिता चीनच्या अशांत भाग म्हणजे तिबेट, शिंजियांग प्रांत आणि इनर मंगोलियामध्ये होणाऱया अत्याचारांना वेळोवेळी जगाच्या पुढे आणावे लागेल. चिनी मालावर बहिष्कार घालून चीनला धडा शिकवावा लागेल.