सामाजिक न्याय म्हणजे काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप देशपांडे

राज्य शासनाकडून 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. तसा तो जागतिक सामाजिक न्याय दिवसही आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा हा जन्म दिवस. सामाजिक न्याय प्रस्थापित होण्यासाठी त्यांचे कार्य खूप महत्त्वाचे आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक हक्क, स्त्री-पुरुष समानता समाजातील सर्वच थरांतील व्यक्तींना विकासाची, शिक्षणाची संधी ही सामाजिक न्यायाची उद्दिष्टे आहेत.

सामाजिक न्याय म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेप्रमाणे विकासाची संधी देणे अथवा मिळवून देणे. कोणाचेही शोषण होणार नाही, किमान प्राथमिक गरजा पूर्ण होतील हे बघणे, आर्थिक सत्ता केंद्रित होणार नाही ही दक्षता घेणे. समाजातील, आर्थिक, दुर्बल घटकांना सुरक्षितता वाटेल असे वातावरण असणे हीच सामाजिक न्यायाची संकल्पना आहे. न्याय म्हणजे काय, अन्याय म्हणजे काय, याची जाणीव समाजाला होणे महत्त्वाचे आहे. सामाजिक न्याय दोन प्रकारचे असतात. पहिला औपचारिक न्याय, दुसरा अनौपचारिक न्याय. पहिल्या औपचारिक न्यायात न्यायसंस्था, कायदेशीर तरतुदीनुसार दोषी व्यक्तीला शिक्षा केली जाते. अशा न्यायाचे स्वरूप कायदेशीर, गुन्हेगार शास्त्र्ााशी संबंधित असते. केलेल्या कर्माची देवाने दिलेली शिक्षा असेही म्हटले जाते. दुसरा जो अनौपचारिक न्याय आहे, तो राजकीय परिस्थिती, नैतिकता यांच्याशी संबंधित असतो. चांगल्या, वाईटाचा विचार, माणुसकीचा विचार यात असतो. योग्य निकष वापरून हक्काचे वाटप होते का? कोणावर अन्याय होणार नाही हा समतेचा विचार यात असतो. अन्याय करणाऱयांना योग्य ती शिक्षा दिली जात असते.

याव्यतिरिक्त एखाद्या समाजाला एखाद्या गोष्टीसंदर्भात योग्य न्याय मिळाला का? मिळतोय काय? अन्न, वस्त्र, निवारा, मतदान, आरोग्य, शिक्षण, मिळतेय का? वंचितांना न्याय मिळतोय का? वंश, जात, धर्म, विचार याकरिता सर्वांना संधी मिळते का? गरीब, निराधारांचा विचार करून त्यांना प्रवाहात बरोबर आणणे हा संपूर्ण विचार सामाजिक न्याय या संकल्पनेतून मोडतो. छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील तळागाळातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य केले. सर्वसामान्यांसाठी त्यांनी आपले आयुष्य वाहून दिले होते. ते रयतेचे राजे म्हणूनच ओळखले जातात.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिष्यवृत्ती घेऊन परदेशात शिक्षणासाठी गेले होते, पण शिष्यवृत्ती संपल्यामुळे त्यांना परत यावे लागले. शाहू महाराजांना ही गोष्ट समजल्यावर ते स्वतः मुंबईत गेले, पुढील अभ्यास सुरू ठेवायला मदत केली. शोषित, मागासवर्गीयांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात नेता मिळाल्याचे शाहू महाराजांनी जाहीर केले होते. महाराजांनी पुनर्विवाह कायद्याला मान्यता दिली. त्यांना कोणत्याही वर्गासाठी कोणतेही द्वेष मनात नव्हते. अस्पृश्यता मानायला नको म्हणून ते स्वतः अस्पृश्याच्या चहाचे दुकानात चहा प्यायचे. त्यांच्या राज्यात कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये समानतेचे व्यवहार व्हावेत, अस्पृश्यता सहन केली जाणार नाही, माणसाला माणूस समजण्यात येणार नाही, तोपर्यंत विकास होणार नाही असे मत होते. राज्य शासनाच्या वतीने 26 जून हा त्यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. कानाकोपऱयातल्या महाराष्ट्राकडे बघितले तर काय चित्र आहे? अनेक पाडे, वस्त्या, समाज आहे, तो अन्न, वस्त्र्ा, निवारा शिक्षण, आरोग्य व्यवस्था या मूलभूत गरजांपासून वंचित आहे. त्यांना योग्य तो न्याय मिळत नाही. मुलांना शिक्षण मिळू शकत नाही. आरोग्य व्यवस्था नाही.

आदिवासींच्या समस्या, प्रश्न आहेत. स्त्र्ायांच्या विषयाचे, हुंडाबळी, लैंगिक शोषण, बलात्कार हे प्रश्न आहेत. बालकांच्या कुपोषणाचे प्रश्न आहेत. बाल कामगारांची समस्या आहे. सामाजिक न्याय दिवस साजरा करताना, असंघटित कामगार, स्त्र्ाया यांना काम देत असतानाच मानवतेच्या भावनेतून दिले जाते का? अन्याय होत नाही ना, हा विचारही महत्त्वाचा आहे. आजची परिस्थिती लक्षात घेता सामाजिक न्याय हा दिवस साजरा करताना त्यादृष्टीने खरोखरच न्याय दिला जातोय का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

[email protected]