पश्चिमरंग : रोषणाईचे संगीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुष्यंत पाटील

1748 मध्ये फ्रान्स आणि ब्रिटन यांच्यात युद्धसमाप्तीसाठी एक करार करण्यात आला. हा युद्धसमाप्तीचा आनंद साजरा करण्यासाठी इंग्लंडमध्ये मोठय़ा प्रमाणात आतिषबाजी व संगीत सादर करायचं ठरलं. हे संगीत रचण्याचं काम हँडेल या इंग्लंडच्या राजघराण्यातील आवडत्या संगीतकाराला देण्यात आलं. या संगीत रचनेची रंगीत तालीम पाहण्यासाठी लंडनमध्ये त्या काळातही महागडी तिकिटं विकली गेली इतकी अभूतपूर्व गर्दी झाली होती. या कार्पामातल्या आतिषबाजीला अनुसरून रचलेले हे संगीत ‘रोषणाईचं संगीत’ म्हणून आजही लोकप्रिय आहे.

युरोपमध्ये 1740 च्या दशकात एक मोठं युद्ध खेळलं गेलं. ऑस्ट्रियन साम्राज्याचा वारस कोण? या प्रश्नावरून हे युद्ध सुरू झालं होतं. या युद्धात ब्रिटन, फ्रान्स आणि स्पेनसहित अनेक युरोपियन देश सामील झाले होते. हे युद्ध 1740 पासून ते 1748 पर्यंत चाललं. नंतरच्या काळात ब्रिटन आणि फ्रान्स यांसारख्या देशांना हे युद्ध नकोसं झालं. फ्रान्स आणि ब्रिटन यांनी शांतीच्या दिशेनं केलेल्या प्रयत्नांना यश येत 1748 मध्ये युद्ध संपलं. युद्धसमाप्तीसाठी एक करार करण्यात आला.

या युद्धसमाप्तीमुळे इंग्लंडमध्ये एखाद्या उत्सवासारखं वातावरण झालं. युद्धसमाप्तीचा आनंद साजरा करण्यासाठी इंग्लंडमध्ये मोठय़ा प्रमाणात आतिषबाजी करायचं ठरलं. आतिषबाजीचा कार्पाम लंडनमध्ये थेम्स नदीच्या किनाऱयावर होणार होता. या काळात इंग्लंडचा राजा होता जॉर्ज (दुसरा). वास्तुकलेत विशारद असणारा, कलात्मक नाटय़गृहे बांधण्यासाठी विख्यात असणारा एक माणूस लंडनमध्ये राहायचा. त्याचं नाव होतं होतं जिओव्हानी सर्वांडोनी. या कार्पामासाठी जिओव्हानी सुंदर लाकडी बांधकाम करणार होता. जिओव्हानीच्या हाताखाली कित्येक कामगारांनी 1748च्या नोव्हेंबरपासून ते पुढच्या वर्षीच्या एप्रिलपर्यंत लाकडी बांधकामावर काम केलं.

या कार्पामाच्या प्रसंगी संगीतही सादर होणार होतं. हे संगीत रचण्याचं काम हँडेल या संगीतकाराकडं आलं. इंग्लंडच्या राजघराण्यात तसा तो आवडता संगीतकार होता. जॉर्ज (दुसरा) चे वडील असणाऱया जॉर्ज (पहिला) यांच्यासाठी त्यानं ‘वॉटर म्युझिक’ रचलं होतं. जॉर्ज (दुसरा) याच्या राज्याभिषेकप्रसंगीचं संगीतही हँडेलनंच रचलं होतं. पण हँडेलसाठी हे काम त्रासाचं होणार होतं. या संगीताविषयी हँडेलच्या डोक्यात काही कल्पना होत्या, तर राजघराण्यातल्या मंडळींच्या डोक्यात काही वेगळ्याच कल्पना होत्या. राजा जॉर्ज (दुसरा) याला याप्रसंगी मुळात संगीतच नको होतं, पण युद्धप्रसंगी वाजवण्याच्या वाद्यांचा जास्तीत जास्त समावेश करून हे संगीत रचण्यात येईल, असं सांगितल्यावर जॉर्जला संगीताची कल्पना पसंत पडली. हँडेलला याप्रसंगीच्या संगीतात व्हायोलिनसारख्या वाद्यांचा वापर मोठय़ा प्रमाणात करायचा होता, पण राजघराण्यातल्या लोकांची इच्छा असल्यानं त्याला वाद्यांमध्ये बदल करावा लागला.

कार्पामाच्या आयोजकांना वाटत होतं की, या कार्पामाची एक रंगीत तालीम व्हावी, पण हँडेल प्रत्यक्ष कार्पामाच्या आधी लोकांसमोर जाहीर प्रकारे रंगीत तालीम करण्याच्या स्पष्ट विरोधात होता. रंगीत तालमीचा कार्पाम कित्येक वेळा जाहीर झाला आणि हँडेलची इच्छा नसल्याने रद्द करावा लागला. खरं तर रंगीत तालमीच्या वेळी आतषबाजी होणार नव्हती. शेवटी 21 एप्रिलला हँडेलला कार्पामातल्या संगीताची रंगीत तालीम करावी लागली.

त्या काळातल्या लोकांना अशा प्रकारचे संगीताचे कार्पाम पाहायला मिळणं अगदीच दुर्मिळ होतं. त्यामुळे या रंगीत तालमीची लोक आवर्जून वाट पाहत होते. रंगीत तालीम बघायला तिकीट काढून तब्बल 12 हजार लोक आले होते. त्या काळात म्हणजे 1749 सालीही लंडनमध्ये इतकं ट्रफिक जॅम झालं की, लंडन ब्रिज जवळ जवळ तीन तासांसाठी ट्रफिक जॅममुळे बंद होता. गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत काही लोक जखमीही झाले होते.

रंगीत तालमीनंतर सहा दिवसांनंतर प्रत्यक्ष कार्पाम झाला. हँडेलने रचलेलं संगीत ‘डान्स सुईट’ प्रकारातलं होतं. कार्पामातल्या आतषबाजीला शोभेल अशा प्रकारचं हे संगीत होतं. यात काही डान्स मूव्हमेंट्स होत्या. हँडेलने रचलेलं हे रोषणाईचं संगीत त्याच्या वॉटर म्युझिकसारखं आजही लोकप्रिय आहे.

प्रत्यक्षातल्या कार्पामाच्या प्रसंगी आतषबाजीमुळे आग लागली आणि बराच गोंधळ उडाला. राजा तिथून लवकर बाहेर निघून गेल्यामुळे वाचला. नाहीतर राजाही जळून खाक झाला असता.

हँडेलचं संगीत लोकांना खूप आवडलं. कालांतरानं हँडेलने या संगीतात थोडे फेरफार केले. त्याला हवं होतं त्याप्रमाणे त्याने संगीतात व्हायोलिनसारखी वाद्यं आता टाकली. या बदलानंतर हे संगीत आता राजवाडय़ाच्या आतही सादर केलं जाऊ शकणार होतं.

हँडेलचं हे संगीत आजही लोकप्रिय आहे. अलीकडच्या काळात (2002 मध्ये) इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) हिच्या कार्यकाळाला 50 वर्षं झाल्याबद्दल लंडनच्या बकिंगहॅम राजवाडय़ात हँडेलचं हेच संगीत आतषबाजीसहित सादर करण्यात आलं. इतक्या वर्षांनंतरही हँडेलचं हे संगीत इतकं लोकप्रिय का असावं हे पाहण्यासाठी आपण यू टय़ूबवर जाऊन वर Jej Music for the Royal Fireworks हे एकदा तरी ऐकायलाच हवं.
❚ [email protected]