पदयात्रेचे प्रत्यक्ष चित्रण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयंत दिवाण

‘नो आखाली’ ही हिंदी कादंबरी नुकतीच वाचली. ‘नो आखाली’ हिंदुस्थानी स्वातंत्र्य आंदोलनातील उत्पृष्ट पर्व आहे. मानवीय इतिहासातील अत्युच्च शिखर आहे.

डॉ. सुजाता चौधरी यांनी ही कादंबरी लिहिली आहे. डॉ. सुजाता भागलपूर बिहारच्या आहेत. त्यांच्या नावावर कथा, कादंबरी, कविता संग्रह आहे. गांधीजींवर त्यांनी अनेक अंगांनी विपुल लेखन केले आहे.

त्या आपल्या भूमिकेत लिहितात की, ही कादंबरी गांधीजींच्या नो आखालीतील सत्तेचाळीस गावांच्या नागव्या पायाने केलेल्या पदयात्रेचे प्रत्यक्ष चित्रण आहे. इतिहासातील तथ्यांचा जसेच्या तसे चितारण्याचा हा प्रयत्न आहे.

लेखिकेने गांधीजींच्या मनोव्यापाराला यशस्वीपणे पकडले आहे. प्रार्थना सभेत गांधीजींनी श्रोत्यांशी साधलेला संवाद दंगलग्रस्तांचे सांत्वन करताना व्यक्त केलेले विचार ओघवतेपणे येतात. जाता जाता सहजपणे त्या तेथील आर्थिक, सामाजिक ताण्याबाण्याची माहितीही देतात. त्या लिहितात, ‘येथे हिंदू-मुस्लिममधील संपत्तीचे वितरण खूपच असंतुलित आहे. अठरा टक्के हिंदूंकडे चौसष्ठ टक्के संपत्ती व जमीनदारी आणि ब्याऐंशी टक्क्यांकडे मात्र छत्तीस टक्के संपत्ती.
कादंबरीत एका ठिकाणी – सुशीला नैयर गांधींना म्हणतात — बापू आपके पैरों से रक्त निकल रहा हैं। गांधींचे उद्गार आहेत — जहां पर इंसानियत की हत्या हुकी, जहां पर इतने निर्दोष इन्सानों के रक्त बहे वहां मेरे शरीर के थोडे से खून गिरने से जो वेदना होगी उससे मेरा दर्द, मेरी तकलीफ तो कम नही होगी… पर शायद पुछ शुद्ध हो जाये। जहां लोग तप करते है, कष्ट उठाते हैं वह जगह तपस्थली बन जाती है, इस स्थान के लोगों ने इतने कष्ट सहन किये हैं यह मेरे लिए तपस्थली है – वे नंगे पांव आगे बढ गये।… असे उद्गार कादंबरीत जागोजागी पेरले आहेत. हे उद्गार आपल्या मनाचा ठाव घेतात.

गांधीजींच्या प्रार्थना सभेत तीन दिवसांपासून एखाद् दुसरी व्यक्ती हरकत घेत होती. प्रार्थना स्थगित होत होती. एका व्यक्तीच्या विरोधाला इतके महत्त्व का देता, असे गर्दीतील लोक म्हणत होते. गांधीजींचे उत्तर होते, “यदि भारी बहुमत प्रार्थना में बाधा पहुंचाने की धमकी देता तो मैं अवश्य उनके रोष का सामना करके प्रार्थना करता। परंतु आपत्ति करनेवाले इक्के दुक्के लोग ही है। मैं अधिक संख्या के बल पर उन्हें दबा कर प्रार्थना करुं तो यह भक्ति की नहीं शैतान की विजय होगी । प्रार्थना का लक्ष्य मनुष्यों के हृदयों में शांति की स्थापना करना है न कि अल्पमत को दबाना या उसे कुचल देना।’’ अशा संवादांची पेरणी कादंबरीचा पोत खुलवत जाते.

या कादंबरीत नो आखालीतील गांधीजींच्या ब्रम्हचर्य प्रयोगाचा कोठेही उल्लेख नाही, परंतु काही संकेत देणारी विधाने यात आहेत. एक ठिकाणी गांधीजींच्या तोंडी स्वागत आहे. ते म्हणतात, “जितना गहन अंधकार
होता जायेगा… सभी सहारे छूटते जायेंगे वह (ईश्वर) उतना ही अपना हाथ बढाता जायेगा। लेकिन इसके लिए अपने को और भी शुद्ध करना होगा । सत्य, अहिंसा, ब्रम्हचर्य के विषयों का कठोरता से पालन ही नहीं, कसौटी पर कसने का समय भी आ
गया है’’

दोनशे चोवीस पृष्ठांची ही कादंबरी आहे. गांधी कोलकात्यात 15 ऑगस्ट 1947 रोजी असेपर्यंतचा हा पट आहे. लेखिकेने विनाकारण विस्तार केला आहे. नो आखालीतच कादंबरीचा शेवट झाला असता तर अधिक बरे झाले असते, मात्र नो आखालीसारखी कादंबरी लिहिणे हे एक धाडसच म्हणावे लागेल. गांधीजींच्या मनोव्यापाराला लेखिकेने पचवले आहे. ज्याचा प्रत्यय वाचताना येत राहतो. प्रा. श्याम पाखरे व रमेश ओझा मिळून नो आखालीवर मराठीत कादंबरी लिहित आहेत. आपण आशा करुया की लवकरच ती आपल्या हाती येईल.

नो आखाली
लेखिका ः सुजाता,
प्रकाशन ः वाणी प्रकाशन, नयी दिल्ली
मूल्य ः 350 रुपये, पृष्ठs ः 224