
>> नेहा राजपाल– आकाश राजपाल
नेहा आकाश राजपाल. जोडीदाराची सोबत… त्याच्या सोबतचे रोजचे क्षण… सारेच उत्कट… तरल…
मधुचंद्र म्हणजे ः लग्न झाल्यानंतर देवदर्शन करुन बाहेर फिरण्यासाठी जोडप्याने जावे. एकांत शोधायला काही दिवसांसाठी बाहेर फिरायला जाणे. एकमेकांना ओळखून घेण्यासाठी ही खूप छान पद्धत आहे.
फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले? ः लग्नापासूनचे आमचे सगळे प्लॅन सहज असे होते, तीन महिन्यात लग्न झालं. एका महिन्यात आम्ही लग्नाची प्लॅनिंग केली. त्या एका महिन्यातच नवऱयाने ठरवले की आपल्याला तीन दिवसच फिरायला जायला मिळतायत. त्यामुळे त्यावेळेत आम्ही ठरवले की तीन दिवस काढून आपण महाबळेश्वरला जाऊन यायचे. जवळ पण होतं.
आवडते ठिकाण? ः तिथलं महाबळेश्वर मंदिर फार आवडलं होतं. लग्नानंतर जेव्हा तिथे गेलो त्यावेळी प्रत्येकवेळी आम्ही आवर्जुन त्या मंदिरात जायचो. खूप शांत जागा आहे.
ठिकाणाचे वर्णन ः आमंच लग्न झालं 1 जानेवारीला. ते थंडीचे दिवस असतात. तेव्हा 4 डिग्री एवढं थंड होते. आपल्या महाराष्ट्रात मुंबईच्या इतक्या जवळ इतकं थंड ठिकाण आपल्याइथे आहे. प्रत्येकाने थंडीत तिथे जाऊन यायला हवे . निसर्गरम्य वातावरण असतं. त्यामुळे महाबळेश्वर बेस्ट आहे.
मधुचंद्रासाठी शॉपिंग ः मी फारशी शॉपिंग करत नाही. पण तिकडे खूप छान छान लहान लहान दुकानं आहेत. रस्त्यांच्या बाजूला लेदरच सगळं सामान मिळतं. तिकडे हॅट्स, जॅकेट्स, कोल्हापुरी चप्पल खूप सुंदर मिळतात.
काही खास क्षण ः सगळेच खास क्षण आहेत. आपण एकमेकांच्या सवयी आपल्याला कळायला लागतात. एकमेकांचे स्वभाव, राहण्याची पद्दत सगळं, बाहेर माणूस कसा वागतो आणि आतून कसा आहे हे कळंत. आकाशच्या स्वभावातील पैलू कळायला लागला. एकांतातही तो एका स्त्र्ााrबरोबर किती आदराने वागतो आणि इतका छान वावरतो. तो जेव्हा जेव्हा माझ्यासोबत असतो तो माझ्यासाठी खास क्षण होता.
मधुचंद्र हवाच की… ः असायला हवा. आम्ही तीन दिवस काढले खरे पण नंतर आम्ही दरवर्षी जरा जास्त वेळ काढून सुट्टीवर जायला लागलो. मधुचंद्र नक्कीच हवा. लग्नाच्या धावपळीत इतका थकवा येतो की शारिरीक थकव्याबरोबर मानसिकदृष्टय़ाही थकवा येतो. इतक्या सगळ्या फॉर्मेलिटी असतात. त्यात एकांत मिळणं आवश्यक असतं.
एकमेकांशी नव्याने ओळख ः आम्ही एकमेकांना नव्यानेच ओळखत होतो. तीन महिन्यात लग्न झाल्यावर एक एक गोष्ट कळायला लागते विशेषता माझा नवरा खवय्या आहे. त्यामुळे त्याला काय पदार्थ आवडतात, बाहेर खायला आणि घरचे काय आवडतात ते कळंल. आम्ही एकत्र राहिल्यावर कळतं.
तिथला आवडलेला खाद्यपदार्थ ः स्ट्रॉबेरी तिथली फार प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी क्रीम तिथे फारच प्रसिद्ध आहे. ती फारच फ्रेश तिकडे मिळते. dस्ट्रॉबेरी माझी फारच फेव्हरेट आहे. विम्बल्डनमध्ये लंडनमध्ये जी स्ट्रॉबेरी क्रीम मिळते तशीच चव महाबळेश्वरला मिळते.
अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिसीझम ः तेव्हा आपण इतक्या रोमॅण्टिक मूडमध्ये असतो ना की अनोळखी ठिकाणही रोमॅण्टिक होणार.
जोडीदाराची खास आठवण? ः आकाशने गाडी खूपच छान चालवलेली आणि ती आमची पाच तासांची सफर खूप छान होती. रोड ट्रिप होती. तो खूप रोमॅँण्टिक आहे. ती एक खास गोष्ट आहे त्याच्यात.
मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार ः एक माणूस म्हणून तो फार चांगला आहे. आमच्या लग्नाला 19 वर्ष झाली तरी आजही आमचा प्रत्येक क्षणच नव्यासारखा असतो. आम्ही ते नव्याने जगत असतो. आम्हाला एकमेकांची साथ किंवा जे क्षण आम्ही एकत्र घालवतो ते नेहमी लक्षात राहण्यासारखे असतात. तेवढ आमच्यात समजुतदारपणा आहे. आम्ही एकमेकांशी जसे आहोत तसेच राहतो. पहिल्या दिवशी भेटलेलो अगदी आम्ही 19 वर्षांनंतरही तसेच आहोत. त्यामध्ये काही फरक पडलेला नाही.
























































