निमित्त – प्राणीसुद्धा इतिहास घडवतात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रतीक राजूरकर

सेंट हेलेना इतिहासात दोन बाबींसाठी प्रसिद्ध आहे. दुसरा इतिहास घडवला आहे तो जॉनथनने. इतिहास केवळ मानवच घडवू शकतात हा समज जॉनथाने मोडीत काढला आहे. जॉनथन केवळ एका कासव प्रजातीपुरता मर्यादित न राहता निसर्गाने दिलेल्या वरदानामुळे दीर्घकाळ अस्तित्व टिकवून ठेवणारा जीवांचा प्रतीक ठरला.

वर्ल्ड बुक ऑफ गिनिज रेकॉर्डस्च्या नोंदीनुसार जगातील सर्वात वयोवृद्ध कासव जॉनथनचे वय 190 वर्षांपेक्षा अधिक आहे. कदाचित जॉनथनचे वय हे त्यापेक्षा अधिकसुद्धा असण्याची शक्यता आहे. कारण त्याच्या जन्माची निश्चित नोंद आढळून येत नाही. शास्त्राrय परीक्षण आणि अंदाजानुसार जॉनथनचा जन्म 1832 सालचा असल्याचा एक अंदाज वर्तवला जातो. अद्याप यापेक्षा अधिक वयोमान असलेला प्राणी पृथ्वीवर असल्याचा शोध लागलेला नाही. म्हणूनच जॉनथनला त्याबाबत आज तरी सर्वात वयोवृद्ध प्राणी म्हणून मान्यता आहे. ब्रिटन राजवटीचा भाग असलेल्या सेंट हेलेना या द्वीपावर जॉनथनचे वास्तव्य आहे. आजच्या जगातील सर्वात वयस्कर प्राणी म्हणून जॉनथनची होणारी गणना कासव प्रजातीला निसर्गाने दिलेले वरदानच आहे. कारण इतर प्राण्यांच्या तुलनेत कासवाची चयापचय क्रिया ही कासवगतीने असल्याकारणाने कासवांच्या प्रजातीची वाढ फारच संथ आहे. हेच कासवांच्या दीर्घायुष्याचे शास्त्राrय गुपित आहे. कासव हे आयुर्मानाच्या बाबतीत ‘लंबी रेस का घोडा’ आहे असे म्हणता येईल. अगदी अतिशयोक्ती करायची झाल्यास जॉनथन पंचतंत्रातील ससा-कासव यांच्या शर्यतीचा साक्षीदार असावा इतका प्राचीन आहे. इतके वयोमान असूनही जॉनथनची इंद्रिये अगदी तल्लख आहेत. भरपूर झोप, काकडी, गाजर, सफरचंद यांसारखी फळे ही त्याची आवडीची खाद्ये आहेत. शिवाय प्रजननाच्या बाबतीतसुद्धा जॉनथन आजही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतो असे त्याची देखभाल करणारे पशुवैद्यकीय अधिकारी अभिमानाने सांगतात.

जीव म्हटला की, शारीरिक व्याधी या येणारच. त्याला जॉनथनसुद्धा अपवाद नाही. 190 पेक्षा अधिक वय असल्याने जॉनथनची दृष्टी आणि घ्राणेंद्रिय मात्र आता साथ देत नाहीत. त्याला हाताने भरवून खाऊ घालणे हा त्याची काळजी घेणाऱयांचा नित्यक्रम आहे, परंतु थंडीच्या दिवसांत जॉनथन आपले अंग चोरून असतो तर प्रसन्न सूर्यप्रकाशात आपले पाय, मान बाहेर ठेवून सौर ऊर्जा ग्रहण करून शारीरिक तापमानाचा समतोल साध्य करतो. जॉनथनचे कान आजही तीक्ष्ण असून दृष्टी नसल्याने आवाजाच्या दिशेने त्याचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. येणाऱया पर्यटकांच्या समूहासमवेत मिसळण्यात जॉनथन अतिशय उत्साही आहे. दृष्टी नसूनही आपल्या वार्धक्याचे वास्तव मान्य करून जॉनथनची जगण्याची दृष्टी सकारात्मक तर आहेच, शिवाय इतरांना प्रेरणा आणि ऊर्जा देणारी आहे. सेंट हेलेना येथील राज्यपालांच्या हिरवळीवर जॉनथनचे बहुतांशी आयुष्य गेले आहे. राजवाडय़ातील वास्तव्यामुळे आज जगातील सर्वात वयोवृद्ध प्राण्याची ओळख कळू शकली. असे म्हणतात जॉनथनचा जन्म झाला तेव्हा राणी व्हिक्टोरिया बाल्यावस्थेत होती. सेंट हेलेनाच्या 31 राज्यपालांना जॉनथनचा सहवास लाभला. अगदी अनेक महत्त्वाचे शोध जॉनथनच्या जन्मानंतरचे. पहिले -दुसरे महायुद्ध, जगातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा जॉनथन साक्षीदार असूनही याचा जॉनथनच्या जीवनाशी काहीही संबंध नाही. एका राज्यपालांच्या शासकीय निवासाच्या हिरवळीवर जॉनथन निसर्गाने बहाल केलेले दीर्घायुषी जीवन आनंदाने जगतो आहे. राणीचे निधन, ब्रेक्झिट, ब्रिटनचे राजकीय स्थित्यंतर… अनेक घडामोडी घडल्या, परंतु जॉनथनचे पृथ्वीवरील स्थान आजही अढळ आहे.

जॉनथनचे वय बघता त्याच्या पूर्वजांची माहिती उपलब्ध नाही, परंतु जॉनथनचे दीर्घायुष्य बघता जॉनथनपासून त्याच्या वंशाचा जन्म झाला. भविष्यात जॉनथनचे कुळ हा काwतुकाचा आणि संशोधनाचा विषय ठरेल. जॉनथनच्या पिढीतील कासवांना मनुष्यप्राणी उद्या अभिमानाने मिरवतील. कासवांच्या पिढीत जॉनथनने एक इतिहास घडवला आहे. जॉनथन आणि त्याच्या पुढच्या पिढीचा मनुष्यप्राणी साक्षीदार असणार आहे. गेल्या दोन शतकांत प्राणी, मानवजातीवर, निसर्गावर अनेक विषाणूंचा प्रादुर्भाव झाला. झालेली जीवितहानी अपरिमित होती. जॉनथन केवळ एका कासव प्रजातीपुरता मर्यादित न राहता निसर्गाने दिलेल्या वरदानामुळे दीर्घकाळ अस्तित्व टिकवून ठेवणारा जीवांचा प्रतीक ठरला. अभ्यासकांच्या मते जॉनथनला सेंट हेलेना येथे स्थलांतरित केले तेव्हा त्याची पूर्ण वाढ झालेली होती आणि त्याचे वय होते 50 वर्षे. एपंदर आजचे जॉनथनचे वय बघता तेव्हा त्याचे सरासरी वयोमान होते अवघे 25 वर्षे.

1891-92 साली तत्कालीन ब्रिटिश राज्यपाल विलियम ग्रे विल्सनने पूर्व आफ्रिकी देश सेशल्स येथून मिळालेली भेट जॉनथनला सेंट हेलेना येथील आपल्या शासकीय निवासस्थानात आणले होते. अभ्यासकांच्या मते जॉनथन हा सेशल्स जायंट टॉरटाईज प्रजातीचे कासव आहे, जे कधीकाळी नामशेष झाल्याची मान्यता होती. त्याकाळी राजघराण्यांकडून कासव भेट देण्याची प्रथा अस्तित्वात होती. जहाजाने प्रवास करणाऱयांचे कासव हे आवडते खाद्य होते. म्हणूनच विशाल कासवांच्या प्रजाती नामशेष झाल्या. अनेक दिवस समुद्र प्रवासासाठी कासवांची अन्नासाठी शिकार मोठय़ा प्रमाणात झाली. जॉनथनच्या बाबतीत तो दुर्मिळातील दुर्मिळ प्रकारात मोडतो. कारण त्याने त्या प्रजातीच्या कासवाचे कमाल आयुष्यमान 150 वर्षे कधीच ओलांडले आहे. जॉनथनच्या प्रजातीचे अद्यापही 80 कासव भूतलावर असण्याची शक्यता अनेक संशोधनानंतर 2014 साली अभ्यासकांनी वर्तवले होते. याअगोदर 188 वर्षे जगलेल्या कासवाची नोंद आहे. जॉनथनने तो विक्रमसुद्धा मोडीत काढला आहे. टुई मलिला (Tu’i Malila) नामक कासव 1777 साली टोंगाच्या राजघराण्याकडून इंग्रज पॅप्टन कुकला भेट देण्यात आले होते. 1965 साली त्या कासवाचा मृत्यू झाला. सेंट हेलेना इतिहासात दोन बाबींसाठी प्रसिद्ध आहे. नेपोलियन जेव्हा 1815 साली वॉटर्लूच्या युद्धात पराभूत झाला त्यादरम्यान नेपोलियन अखेरच्या काळात अज्ञातवासात सेंट हेलेना येथे वास्तव्यास होता. दुसरा इतिहास घडवला आहे तो जॉनथनने. इतिहास केवळ मानवच घडवू शकतात हा समज जॉनथाने मोडीत काढला आहे.
 [email protected]