
>> राजू वेर्णेकर
अल कायदा, लष्कर-ए-तोएबा अशा बऱयाच अतिरेकी संघटना ठिकठिकाणी कार्यरत असतानाच आता येमेनमधील हुती (अंसार अल्ला) ही अतिरेकी संघटना तिच्या लाल समुद्रातील परदेशी जहाजांवरील हल्ल्यांमुळे प्रकाशझोतात आली आहे. इस्रायलने हमासवर गाझापट्टीत केलेल्या हल्ल्याच्या विरोधात आपण लाल सागरमार्गे इस्रायलकडे जाणाऱया व्यापारी जहाजांवर हल्ले करीत असल्याचा दावा हुतीने केला असला तरी खऱया अर्थाने हा लढा सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात (यूएईच्या) विरोधात आहे. हुतीच्या कारवायांना इराणचा छुपा हुती बंडखोरांनी आतापर्यंत लाल सागरातून प्रवास करणाऱया 22 जहाजांवर हल्ले केले असून लाल सागर आणि एडनच्या आखातातून मार्गक्रमण करणे कठीण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांत 360 जहाजांनी (280 पंटेनर जहाजांसह) आपला मार्ग बदलून केप ऑफ गुड होप आणि सुएझ कालवामार्गे आपला प्रवास सुरू ठेवला आहे. या द्राविडी प्राणायमात जहाजांना 10 ते 12 दिवस जास्त प्रवास (1,900 नॉटिकल मैलांचा अधिक प्रवास) (विशेषतः आशिया-उत्तर युरोप मार्गावर) करावा लागतो.
बंडखोर मूळ येमेनच्या उत्तर भागातील हुती या आदिवासी संघटनेचे असून ते झैदी शिया पंथाचे अनुयायी आहेत. सुन्नी इस्लामच्या सलाफी विचारसरणीला त्यांचा आधीपासून विरोध आहे. येनेमचे तत्कालीन अध्यक्ष अब्दुल याया अल सलाल यांच्या कथित भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी धर्मगुरू हुसेन अल हुती यांच्या नेतृत्वाखाली हुतीची स्थापना करण्यात आली. 2003 मध्ये लेबेनॉनमधील हेझबोला या लष्करी संघटनेच्या समर्थनाने अमेरिका, इस्रायल आणि ज्यू धर्मियांच्या विरोधात लढा उभारण्याचा निश्चय हुतीने केला. 2004 मध्ये येमेनी सैन्याच्या हल्ल्यात हुसेन अल हुतीचा मृत्यू झाल्यानंतर हुसेन अल हुतीचा भाऊ अब्दुल मलिक अल हुती याच्या नेतृत्वाखाली हुतीची पुढील वाटचाल सुरू झाली. विद्रोही सेना उभी राहिल्यानंतर 2004 ते 2010 पर्यंत हुतीने सलाल यांच्या सैन्याशी सहा वेळा लढा दिला.
सुरुवातीला अरब हुकूमशहा अली अबी तालिब यांची सत्ता, नंतर दक्षिण येमेनमध्ये ब्रिटिश राजवट आणि 1960 च्या सुमारास यादवी युद्ध असा संघर्ष सुरू राहिला. नंतर 1990 मध्ये मार्क्सिस्ट पीपल्स डेमोव्रेटिक रिपब्लिक ऑफ येमेन (दक्षिण) आणि शियांच्या ताब्यात असलेले उत्तर येमेन यांचे विलीनीकरण होऊन येमेन अरब रिपब्लिक उदयास आले. सुन्नी नेते सलाल बरीच वर्षे राष्ट्राध्यक्ष होते. नंतर अब्दारब्बू मन्सूर हादी यांनी 27 फेब्रुवारी 2012 रोजी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. एक वर्ष मुदतवाढ घेऊन 22 जानेवारी 2015 ला त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नंतर काही दिवस हुती सुप्रीम रिव्हॉलूशनरी कमिटीने येमेनची सत्ता हातात घेतली. मात्र थोडय़ाच दिवसांत हादी राष्ट्राध्यक्ष म्हणून परतले. काही वर्षांनंतर 07 एप्रिल 2022 रोजी त्यांनी पुन्हा राजीनामा दिला. उपाध्यक्ष अल मोहसीन अल अहमार यांची हकालपट्टी केली आणि सर्व सूत्रे रशद अल अलिमी यांच्याकडे सुपूर्द केली. सध्या अलिमी राष्ट्राध्यक्ष, तर माईन अब्दुल मलिक सलीम येमेनचे पंतप्रधान आहेत.
सध्या इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर हुतीने पॅलेस्टाईनींची बाजू घेत लाल समुद्रातील जहाजांवर क्षेपणास्त्रs डागण्यास सुरुवात केली. याआधी जानेवारी 2022 मध्ये यूएईच्या रवाबी या जहाजावर कार्यरत सात भारतीय नाविकांना हुती बंडखोरांनी लाल सागरातून ताब्यात घेतले होते. त्याच महिन्यात यूएईची राजधानी अबुधाबीमध्ये ड्रोन हल्ल्यामुळे लागलेल्या आगीत तीन टँकरचा स्पह्ट होऊन दोन भारतीय व एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला होता आणि सहा जण जखमी झाले होते. त्या वेळी हुती बंडखोरांनी आपणच यूएईला लक्ष्य केल्याचा दावा केला होता. शिवाय सौदी अरेबिया आणि यूएईवरील अनेक आधीच्या हल्ल्यांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती.
2023 च्या शेवटाला यूएईने हुती लक्ष्यांविरुद्ध हवाई मोहीम तीव्र करताच हुती बंडखोरानी ऑक्टोबरपासून सूड घेण्यास सुरुवात केली. याचाच भाग म्हणून भारतीय सागरी किनाऱयापासून 700 नॉटिकल मैल अंतरावर एम. व्ही. रुएन या व्यापारी जहाजावर चाचेगिरी करण्यात आली, तर गुजरातमधील पोरबंदरच्या दक्षिण-पश्चिमेला 220 नॉटिकल मैलावर एम. व्ही. चेम प्लूटो या व्यापारी जहाजावर 23 डिसेंबरला ड्रोन हल्ला करण्यात आला. या जहाजावर एक व्हिएतनामी आणि 20 भारतीय नाविक होते. नंतर भारतीय तटरक्षक दलाने जहाजाशी संपर्क करून जहाजातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी त्याला मुंबई बंदरात आणले.
गेल्या काही दिवसांत लाल सागर, एडनचे आखात आणि मध्य-उत्तर समुद्रातील आंतरराष्ट्रीय नौवहन मार्गाने प्रवास करणाऱया प्रवासी जहाजांच्या सागरी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे हे निश्चित. पाठिंबा असल्याचे म्हटले जाते.
सौदी अरेबिया
मार्च 2015 मध्ये सौदी अरेबियाने 10 देशांची आघाडी स्थापन करून हुतीच्या विरोधात येमेनवर हवाई हल्ले केले. ओमान सोडून यूएई, बेहरीन, कुवैत आणि कतार या आघाडीत सामील झाले. नंतर यादवी युद्धाला सुरुवात होऊन हुतीतर्फे सौदी अरेबिया आणि यूएईवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले करण्यात आले. हुतीचा अमेरिका, इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्या कारवायांना आधीपासून विरोध आहे. आज हुती विरुद्ध सौदी प्रणित युती, हुती विरुद्ध येमेनी सुन्नी बंडखोर, सौदी विरुद्ध इराण अशा विविध गटांत युद्ध सुरू आहे.
इराण
इराण हा शियाबहुल देश असून हुती मुस्लिम याच समुदायाशी संबंधित आहेत. इराणचा सौदी अरेबिया आणि यूएईशी पूर्वीपासूनच वाद आहे. म्हणून हुतीचे बंड म्हणजे इराण आणि साऊदी अरेबिया यांतील परभारी युद्ध असा निष्कर्ष काढला जातो. येमेनचा आर्थिक विकास होऊन झैदी शियांचे हक्क अबाधित रहावेत हे हुतीचे उद्दिष्ट आहे.




























































