
>> ऋता कळमणकर
दंतकथांमधून कोह्याचा उल्लेख नेहमी धूर्त, हुशार असा केला जातो. लहानपणीच्या गोष्टीत नेहमी भेटणारा हा प्राणी, निशाचर आहे. रात्री जोडीने किंवा एकटय़ाने शिकार शोधत फिरतो. दिवसा झोपतो. शत्रूला फसवून कौशल्याने शिकार करतो. आवाज आणि वास यांच्या सहाय्याने इतर कोह्यांच्या संपका&त राहतो. हिंदुस्थानी कोल्हा राखाडी रंगाचा व त्रिकोणी कानाचा आहे. यांचे डोळे मात्र भेदक आणि चाणाक्ष असतात.
आफ्रिकेच्या जंगलात काळ्या पाठीचे ब्लॅक बॅक्ड जॅकल सिंहाने केलेली शिकार पळवताना पाहिले. थोडा वयस्क सिंह शिकार करून मोकळ्या मैदानात बसून खात होता. तेथे हे तीन ब्लॅक बॅक्ड जॅकल त्याला जेरीस आणून त्याच्या शिकारीत मांस चोरत. सिंह एकाच्या अंगावर चाल करून गेला की, दुसरा तोपर्यंत विरुद्ध दिशेने येऊन मोठा तुकडा पळवत असे. तो खाऊन संपले की, पुन्हा सिंहाला त्रास देत. असे सतत चालले होते.
कोल्हा हा सर्वभक्षक शिकारी प्राणी आहे. हा शिकार करून खातो. जॅकल हा शिकार करून खातो त्याचप्रमाणे मेलेल्या प्राण्याचे मांसही खातो. कोल्हा, जॅकल, लांडगा हे सर्व श्वान कुळातील प्राणी आहेत. आर्क्टिक फॉक्स, रेड फॉक्स, इंडियन फॉक्स इत्यादी प्रजाती आढळतात. तसेच जॅकलमध्ये तीन प्रजाती आहेत. त्यातील गोल्डन जॅकल हा 8 ते 10 किलो वजनाचा पिवळसर रंगाचा गळ्यावर पांढरा मार्क असणारा, त्रिकोणी कानाचा. त्याला झुपकेदार शेपूट असते. जॅकल मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान येथे दिसून येतो. छोटे ससे, नवजात हरणे, पक्षी इत्यादी त्याचे खाद्य आहे.
कोल्ह्याप्रमाणेच निष्णात शिकारी असणारे हिंदुस्थानी रानटी कुत्रा किंवा ढोल हेही समूहाने राहतात व समूहानेच शिकार करतात. इंडियन वाइल्ड डॉग हा रंगाने तांबूस असतो. शेपटीला राखाडी रंगाचा झुपका असतो. संख्येच्या बळावर हे रानटी गव्यासारख्या मोठय़ा प्राण्यांवरही हल्ला करतात.
इंडियन वाइल्ड डॉगप्रमाणेच आफ्रिकेत आफ्रिकन पेन्टेड डॉग किंवा आफ्रिकन हंटिंग डॉग हा अंगावर पिवळे, पांढरे, तांबडे मोठे पेंटिंग केल्याप्रमाणे मार्क असतात. हा आकाराने ढोलपेक्षा थोडा मोठा असतो. यांचा समूह मोठी FEMALE लीड करतो. हे समूहाने शिकारीची सर्व बाजूने काsंडी करून शिकार करतात. शिकार करताना मात्र MALE लीड करतो. गझल, इम्पाला यांची हे शिकार करतात. खाताना मात्र छोटय़ा पिलांनाही वाटा मिळतो. ही जमात नामशेष होण्याच्या धोक्यात आहे. बोत्सवाना येथील मोरेमि GAME रिसेर्वे येथे पेन्टेड डॉग हा सहजासहजी न दिसणारा प्राणी मी 8 ते 10 जणांच्या समूहात शिकार करताना पहिला.
































































