
>> सीमा खंडागळे
सध्या ‘बाईपण भारी देवा’ या स्त्राrप्रधान मराठी चित्रपटाला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सुमारे अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यात अशाच एका स्त्रीप्रधान, गूढ व रहस्यमय चित्रपटाने जागतिक चित्रपटसृष्टीत खळबळ उडवून दिली होती. हा चित्रपट होता 1975 सालचा ऑस्ट्रेलियन चित्रपट ‘पिकनिक अॅट हँगिंग रॉक.’
हा चित्रपट ‘पिकनिक अॅट हँगिंग रॉक’ याच नावाच्या 1967 साली प्रकाशित कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी लेखिका जोन लिंडसे यांनी लिहिली आहे व असे म्हटले जाते की, ही कादंबरी सत्यघटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पीटर वेअर यांनी केले आहे.
या चित्रपटाचे कथानक हे 1900 सालचे आहे. युरोपातून ऑस्ट्रेलियात स्थलांतरित लोकांच्या मुलींसाठी असणारी एक बार्ंडग शाळा ही या कथानकाच्या पेंद्रस्थानी आहे. या शाळेच्या 19 किशोरवयीन विद्यार्थिनी व दोन शिक्षिका या व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्यांच्या शाळेपासून जवळ असणाऱया गूढ व भूशास्त्राrयमध्ये महत्त्वपूर्ण असणाऱया अशा प्राचीन खडक ‘हँगिंग रॉक’ला सहलीसाठी जातात. याच सहलीमध्येच चार मुली व एक शिक्षिका या हँगिंग रॉकमधून अचानक बेपत्ता होतात, पण एका आठवडय़ानंतर हरवलेल्या विद्यार्थिनींपैकी दोन मुली सापडतात, परंतु या मुलींना हँगिंग रॉकपासून बेपत्ता झाल्यानंतर काय झाले हेच आठवत नाही. पुढे हा चित्रपट या तीन लोकांचा शोध व या शोधातून समोर येणारी बार्ंडग स्कूलमधील व्यक्तींची रहस्ये दर्शकांसमोर मांडतो. तसेच हा चित्रपट 19व्या शतकातील महिलांसाठी असणारे घुसमटीचे वातावरण, अव्यक्त इच्छा तसेच मानवाचे वनांबद्दल असणारे सुप्त आकर्षण या विषयांवरही प्रकाश टाकतो.
पण मुलींच्या बेपत्ता होण्यामागील न सुटलेले रहस्य हे या चित्रपटाच्या यशाच्या केंद्रस्थानी आहे. या चित्रपटात हरवलेल्या मुलींचे काय झाले असेल याबद्दलचे सुगावे दिले गेले आहेत. या सुगाव्यांद्वारे दिग्दर्शक पीटर वेअर प्रेक्षकांना हरवलेल्या मुलींचे काय झाले याचा स्वतःचा अर्थ काढायला भाग पाडतो. हेच या चित्रपटाचे वेगळेपण आहे. शिवाय दिग्दर्शक पीटर वेअर यांनी चित्रपटाचे छायाचित्रकार रसेल बॉईड यांच्या सहाय्याने ऑस्ट्रेलियाच्या भौगोलिक रचनेचा उत्तम वापर केला आहे. या चित्रपटात दर्शविला गेलेला 1900 सालाचा ऑस्ट्रेलियाचा विस्तीर्ण निर्मनुष्य प्रदेश हा चित्रपटाला गूढ व स्वप्नासारखे रूप प्रदान करतो. या चित्रपटातील विस्तीर्ण निर्मनुष्य प्रदेश व हँगिंग रॉक हे या चित्रपटातील निःशब्द अशा कणखर व्यक्तिरेखाच आहेत. जोडीला ब्रुस स्मेटन यांनी या चित्रपटाला दिलेले संगीत हे या चित्रपटाच्या रहस्याला अधिक गहिरे करते.
‘पिकनिक अॅट हँगिंग रॉक’ हा रसिकांना मुली, झाडे, कीटक सरपटणारे प्राणी, खडक आणि पक्षी अशा अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरील दृश्यांसह संमोहित करून ठेवतो. तसेच चित्रपट संपल्यानंतरही हा चित्रपट रसिकांना विचार करायला भाग पडतो.
[email protected]
(लेखिका या महाराष्ट्रात जनसंपर्क व सोशल मीडिया क्षेत्रात कार्यरत आहेत.)


























































