साहित्यकट्टा – महाराष्ट्राचं लोकधन लोकसाहित्य कोश

>> शशिकांत सावंत

सरोजिनी बाबर यांनी आपल्या 30-35 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या मातीतून निर्माण झालेलं लोकसाहित्य वाचकांसमोर आणलं. आपल्या संपादनाखाली त्यांनी लोकसाहित्याचे खंडच्या खंड प्रकाशित केले… एकप्रकारे विस्मृतीत गेलेलं महाराष्ट्राचं ‘लोक’धन त्यांनी पुन्हा जमा केलं. मौखिक परंपरेनं चालत आलेलं हे लोकवाङ्मय जे काळाच्या पडद्याआड गेलं होतं त्याला पुनरुज्जीवित करण्याचं मोठं काम सरोजिनी बाबर यांनी केलं. यातूनच लोकसाहित्याचा शब्दकोशही आकारास आला.

कोश साहित्य हे जगभरच्या अभ्यासकांना आव्हानात्मक वाटले आहे. कोश बनवणे हे जसे आव्हान असते तसेच चांगला कोश अभ्यासणे हेदेखील एक मोठे आव्हान असते. आज जगात सर्वत्र माहित असलेला कोश म्हणजे ऑक्सफर्डचा 1857 साली जेम्स मुरे नावाच्या प्राध्यापकांच्या हाताखाली बनवला गेलेला कोश. यासाठी समिती नेमली गेली. या समितीने परिपूर्ण असा इंग्रजी भाषेतील बहुतेक शब्द सापडतील असा कोश बनवायचं ठरवलं. नुसता शब्दसंग्रह करून चालणार नव्हतं तर प्रत्येक शब्दाचा कोणत्या प्रकारे उपयोग होतो हेही दाखवून आवश्यक होतं.
1757 चाली प्रसिद्ध विद्वान जॉन्सन यांनी पहिली इंग्रजी शब्द कोश बनवला. त्यासाठी त्यांनी दोन गोष्टी केल्या एक म्हणजे भरपूर पुस्तकं विकत घेतली आणि भाषेत कोणकोणते शब्द वापरात आहेत ते त्यातून नोंदवले आणि दुसरे म्हणजे त्याने काही स्वयंसेवक नेमले ज्यांनी सामान्य लोक कोणते शब्द वापरतात ते नोंदवले. ऑक्सफर्डच्या या पहिल्या शब्दकोशाला जवळपास 70 वर्षे लागली आणि सोळा खंडाचा कोश तयार झाला. आपल्याकडे परशुराम गोडबोले यांनी 870 चाली तयार केलेला कोश, एकभाषीय, बहुभाषीय असे अनेक कोश आहेत. दाते यांचा आठ भागातील कोश हा मराठीतील सर्वाधिक परिपूर्ण कोश मनाला जायचा, पण या कोशांमध्ये प्रामुख्याने प्रमाण भाषेतीलच शब्द आढळतात. महाराष्ट्रातील विविध प्रादेशिक, बोलीभाषेतील शब्द यात आढळत नाहीत. पण सरोजिनी बाबर यांनी 1961 साली तयार केलेला लोकसाहित्य शब्दकोश हा शब्दकोश काही वेगळाच आहे. आपण भाषेत कधी वापरत नाहीत असे हजारो शब्द यात आहेत. आता कोण म्हणेल कसं काय हे शब्द आले कुठून. तर हे लोक भाषेतले शब्द आहेत. साहजिकच ते रोजच्या व्यवहारात म्हणजे आपल्यामुळे पुण्याच्या मराठीत वापरले जात नाहीत. उदाहरणार्थ जजला बोलीभाषेत जडजा म्हणतात हे किती लोकांना माहीत आहे?

सहज हा कोश चाळला तरी आपले बोलीभाषाविषयक ज्ञान उघडे पडते. चाळताना 95 वे पान काढले तर त्यात पुढील शब्द आढळतात. गिरा म्हणजे ग्रहण, गिरा म्हणजे घास, गुजरी म्हणजे सायंकाळचा बाजार, गुडघी मेट म्हणजे थकवा, थकून गुडघ्यावर बसणे. बाळाला तीट लावताना आई ‘अडगुलं मडगुलं, सोन्याचं कडगुलं, रुप्याचा वाळा, ताह्या बाळा, तीट लावू’ असे म्हणते. पण ‘अडगुलं’, ‘मडगुलं’ आणि ‘कडगुलं’ या शब्दांचा किंवा अशाच विसरलेल्या अस्सल मराठी शब्दांचे अर्थ सांगणारा हा ‘लोकसाहित्य शब्दकोश’ आहे. डॉ. सरोजिनी बाबर यांनी महाराष्ट्रातील खेडय़ापाडय़ांत हिंडून प्रचंड प्रमाणात लोकगीते, लोकसाहित्य गोळा केले आहे. त्यांनी स्वतः संपादित केलेल्या किंवा इतरांच्या लोकसाहित्यविषयक पुस्तकांतील शब्दांचे अर्थ सांगणारा हा कोश आहे. कोशाची रचना अशी आहे -शब्द त्याचा अर्थ, त्याचा वापर असलेली कवितेची किंवा गाण्याची ओळ, शब्दाचा इंग्रजी अर्थ. याप्रकारे हा शब्दकोश आपल्याला बोलीभाषेतील अंदाजे पाचेक हजार शब्दांचा परिचय करून देतो.

बाबर यांनी महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती या महाराष्ट्र सरकारच्या प्रकाशनांतर्गत लोकसाहित्य संकलन असलेली 15-16 पुस्तके संकलित केली. जुई मोगरा, एक होता राजा, भाऊबीज अशी स्त्र्ााrगीते आणि कविता आणि कथा यांचे संकलन असणारी ही पुस्तके होती. गावोगावचे कवी आणि कवयित्री यांची गीते त्यातून प्रकाशात आलीच, पण एक मोठा लोकसाहित्य दस्तावेज तयार झाला.

सरोजिनी बाबर यांनी आपल्या 30-35 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या मातीतून निर्माण झालेलं लोकसाहित्य वाचकांसमोर आणलं. आपल्या संपादनाखाली त्यांनी लोकसाहित्याचे खंडच्या खंड प्रकाशित केले. एकप्रकारे विस्मृतीत गेलेलं महाराष्ट्राचं ‘लोक’धन त्यांनी पुन्हा जमा केलं. त्याची वास्तपुस्त केली आणि ते मार्गीही लावलं. मौखिक परंपरेनं चालत आलेलं हे लोकवाङ्मय जे काळाच्या पडद्याआड गेलं होतं त्याला पुनरुज्जीवित करण्याचं मोठं काम सरोजिनी बाबर यांनी केलं. यातूनच लोकसाहित्याचा शब्दकोशही आकारास आला.
प्रास्तविकात त्या म्हणतात – शब्दकोशाची जुळवाजुळव करीत असताना लोकसाहित्य समितीने प्रामुख्याने आपल्या प्रकाशनांचा विचार केलेला असून या कार्यक्षेत्रातील इतर लोक- साहित्यकारांच्या ठळक ठळक व उपलब्ध प्रकाशनांनाही विचारात घेतलेले आहे. प्रारंभी इ. स. 1966 मध्ये तयार झालेला मजकूर तज्ञांचे नजरेखालून जावा या हेतूने डॉ. वि. भि. कोलते व डॉ. ग. मो. पाटील यांना शब्दकोशाची तयार प्रत तपासणीसाठी म्हणून पाठवण्यात आली. त्यांचेकडून जवळजवळ एक वर्षाचा कालावधी गेल्यानंतर अभिप्राय आले. त्यानंतर समितीची नवीन प्रकाशने राजविलासी केवडा व जाई मोगरा ही तयार झाली. त्यांतील शब्दही शब्दकोशात अंतर्भूत करावेत अशी चर्चा निघाली. पुढे डॉ. ग.मो. पाटील हे लोक साहित्य समितीचे सभासद झाले व ते भाषाशास्त्र्ाज्ञ असल्याने नवीन काम त्यांच्यावर सोपवण्यात आले, परंतु त्यांनाही जरूर तेवढा वेळ या कामासाठी देता आला नाही. शब्दकोश पुढे मग असाच रेंगाळला.’
‘तोंडाने काढले आणि हाताने पेरले’ ही लोकसाहित्याची मूळ बैठक असल्याने हा शब्दकोश तयार होत असतान अपार कष्ट वेचावे लागले आहेत. त्यातूनही काही उणिवा राहिल्या असतील याची जाणीव लोकसाहित्य समितीला जरूर आहे. पुढे त्या काही तांत्रिक माहिती देतात. उदाहरणासाठी जा ग्रंथांतून उतारे व पंक्ती उद्धृत केल्या आहेत त्या ग्रंथांतील शुद्धलेखन त्या-त्या उदाहरणांत कायम राखले आहे. इतरत्र महाराष्ट्र शासनाने मान्य केलेले शुद्धलेखन स्वीकारले आहे. या ग्रंथात शब्दांचे अर्थ देताना आम्ही मराठीबरोबरच इंग्रजीतूनही अर्थ दिलेले असल्याने परभाषेतील अभ्यासकांची मोठी सोय झालेली आहे असे आम्ही मानतो. हास्य आणि दुŠख या दोनच भावनाविष्कारांनी जगाची भाषा तयार केलेली असल्यामुळे आणि लोकसाहित्य हे मानवाच्या स्थायीभावांना स्पर्श करूनच जन्माला येत असल्या कारणाने सर्व भाषा भगिनींच्या सानिध्यातील अभ्यासकांना हा शब्दकोश फूल नाही फुलाची पाकळी म्हणून का होईना उपयोगी पडल्यास आम्ही आमच्या श्रमाचे सार्थक झाले असे मानू.

शब्दकोश म्हणून याचा उपयोग आहेच पण वेळोवेळी यातून प्रीतिरस, कौटुंबिक नातीविषयक काव्य, लोककथा, ग्रामीण विनोद, म्हणी, उखाणे याचे विलक्षण नमुने मिळतात. उदा. दाल्ला म्हणजे नवरा हे सांगताना उदाहरण म्हणून एक स्त्र्ााrगीतांची ओळ दिलीय

‘दोन बायकांचा दाल्ला बसला चुलीपाशी
जळाली मिशी, बोंब गेली वेशीपाशी
किंवा
सभागती म्हणजे स्वभावगती, सहज
बहीण भावंडाचं भांडण झालं राती
बंधू म्हणे अजून राग किती
माझं बोलणं सभागती

लोकगीतांतील आणि कहाण्यांतील न कळणारे शब्द या लोकसाहित्याच्या शब्दकोशात मिळतात. याप्रकारे कोश चाळताना, बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यांनी एकमेकांना किती काय दिले आणि घेतले हे लक्षात येते.
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या