
>> शुभांगी बागडे
अर्भकमृत्यू, बालमृत्यू, मातामृत्यू यामागे कुपोषणाची समस्या हे महत्त्वाचे कारण आहे. कुपोषणाच्या समस्येवर गावोगावी अंगणवाडय़ा कार्यरत आहेत, मुलांची आरोग्य देखभाल करण्यासाठी आशा सेविका आहेत असं म्हणत समाज आणि इतर घटक नामानिराळे होतात. मात्र कुपोषण निर्मूलन हे काही एका विशिष्ट खात्याचं वा घटकाचं काम नाही हे जाणत समाजातील अनेक स्वयंसंस्थांनी या समस्येचा कार्यभार स्वीकारला. ज्याचा सकारात्मक परिणाम होत महाराष्ट्रातील काही भागातील ही समस्या काही प्रमाणात का होईना, दूर झाली आहे.
ग्रामीण असो वा शहरी भागातील महिलांच्या नियमित दिनचर्येतील बहुतांश कामाचा वाटा हा तिच्याकडेच जातो. तिची केवळ रांधण्याची, वाढण्याची जबाबदारी आता अर्थप्राप्तीपर्यंत पोहोचली असली तरी गृहिणींच्या जबाबदारीतून मात्र तिची मुक्तता झालेली नाही. याचा परिणाम तिच्या आरोग्यावर तर झालाच, पण् त्याचबरोबर तो वारशाने पुढच्या पिढीमध्येही आला. आहारपोषणाची कमतरता आणि शारीरिक कष्ट याचा परिणाम होत अनारोग्याच्या अनेक समस्यांना स्त्र्ााrला सामोरं जावं लागतं. यातीलच एक प्रमुख समस्या म्हणजे, हिमोग्लोबिनची कमतरता अथवा ऑनिमिया. हिंदुस्थानातील खेडय़ांमध्ये दारिद्य्र-कुपोषण-कमी वयातील लग्न-अशक्त गरोदर महिला-जन्माला येणारं ऑनिमिक बाळ हे दुष्टचक्र अजूनही दिसून येतंच. आजही मातामृत्यूला महिलांचं ऑनिमिक असणं हे इतर महत्त्वाच्या कारणांपैकी एक कारण आहे.
अर्भकमृत्यू, बालमृत्यू, मातामृत्यू यामागे कुपोषणाची समस्या हे महत्त्वाचे कारण आहे. कुपोषणाच्या समस्येवर गावोगावी अंगणवाडय़ा कार्यरत आहेत, मुलांची आरोग्य देखभाल करण्यासाठी आशा सेविका आहेत असं म्हणत समाज आणि इतर घटक नामानिराळे होतात. मात्र कुपोषण निर्मूलन हे काही एका विशिष्ट खात्याचं वा घटकाचं काम नाही हे जाणत समाजातील अनेक संस्थांनी या समस्येचा कार्यभार स्वीकारला. ज्याचा सकारात्मक परिणाम होत महाराष्ट्रातील काही भागातील ही समस्या काही प्रमाणात का होईना, दूर झाली आहे.
पुण्यातील मुळशी तालक्यातील काळभोरवाडी, बोतरवाडी, मारणेवाडी आणि वेह्यामधील वांगणी, मांगदरी, कोळवाडी, कातवडी, निगडे, वांगणीवाडी या गावांमध्ये ‘प्राज फाउंडेशन’च्या सहभागाने ‘रचना सोसायटी फॉर सोशल रिकन्स्ट्रक्शन’ या संस्थेचं काम सुरू आहे. हा भाग आदिवासी नसला तरी अतिदुर्गम, डोंगराळ परिसरात मोडतो. तसेच हा भाग बहुतांशी जिरायती शेतीखाली येत असल्याने व कष्टकरी वर्गाचं प्रमाण जास्त असल्याने आर्थिक उत्पन्नालाही मर्यादा दिसून येतात. इथे दळणवळणाच्या मुख्य सुविधा नाहीत. याचा परिणाम निश्चितच बाळांच्या, मातांच्या पोषणावर होताना दिसतो. याबाबत रचना संस्थेच्या संचालिका स्वाती चव्हाण व संस्थेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या सांगतात की, 1992 पासून पुणे जिह्याच्या ग्रामीण भागात आमची संस्था काम करते. मुलं आणि महिला यांचं शिक्षण, आरोग्य, पोषण याच्याशी निगडित हे काम आहे. महिला व मुलांच्या समान संधी व समान हक्कांसाठी गेली 26 वर्षे काम करणारी ही संस्था गेली 10 वर्षे ग्रामीण महिलांच्या ऑनिमियाबाबत प्रतिबंधात्मक काम करत आहे. यात 20 ते 60 वर्षे या वयोगटातील स्त्रियांमधील ऑनिमिया याबाबत काम करताना मुलांच्या पोषणाशी निगडित गोष्टींवरही काम केलं गेलं. मुळात मुलांचं आरोग्य हे त्यांच्या मातांचं आरोग्य, त्यांची आहारशैली याच्याशी निगडित असतं. गोळय़ा आणि औषधांवर अवलंबून न राहता आहारातील बदलाद्वारे या समस्येवर कशी मात करता येईल याबाबत विविध स्तरांवर आम्ही प्रयत्न केले आणि करत आहोत. ज्यात आपसूकच मुलांच्या पोषणाचा अंतर्भाव झाला. आमच्या कार्यशैलीत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक उपाय यांचा समावेश असतो. रचना संस्था गेली 11 वर्षे ‘साथी सेहत’ या संस्थेसोबत वेल्हे व भोर तालुक्यातल्या 60 गावांमध्ये सरकारी आरोग्यसेवेच्या देखरेखीचे काम करत आहे.
कुपोषण नियंत्रणात गावाचा सहभाग वाढवण्यासाठी समुपदेशन करणे, शून्य ते सहा महिन्यांच्या वयाच्या बाळांच्या मातांना भेटणं, त्यांना त्यांच्या बाळांच्या पोषणासाठी माहिती देणं, सहा महिने ते तीन वर्षे या वयाच्या बाळांचा आहार कसा असावा, त्यांना काय खायला द्यावं, घरातील उपलब्ध घटकांमधून पोषक आहार कसा तयार करावा याबाबत संस्थेकडून मातांना मार्गदर्शन केलं जातं. बऱयाच ठिकाणी अशी परिस्थिती होती की, बालकांचं कुपोषण हा बाळाच्या आईने सोडवायचा प्रश्न आहे, असं गावातल्या घरातल्या पुरुषांचं मत होतं. ते बदलवण्यातही रचनाने हातभार लावला. राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा कार्यक्रमाची टीम वर्षांतून दोन वेळा गावात भेट देऊन बालकांची तपासणी करते. या दोन्ही यंत्रणामध्ये समन्वय साधण्याचे कामही रचनाने केले. त्याचाही गावातल्या बाळांच्या आरोग्य तपासणीवर परिणाम झाला.
आहारात सर्व पोषकघटकांचा समावेश करता यावा यासाठी संस्थेकडून परसबागांची संकल्पना राबवण्यात आली. या उपक्रमात अंगणवाडी सेविकांनाही सामावून घेण्यात आले, ज्यायोगे मातांबरोबर मुलांनाही आपला आहार कसा असावा याची जाण देता आली. गाकात सहज उपलब्ध असणाऱया पोषक रानभाज्यांबाबतचा उपक्रम अंगणवाडीत राबवला जातो. ज्यात मातांना व मुलांना परिसरातील भाज्यांमधील अन्नघटक आणि त्यांची उपयुक्तता सांगितली जाते. या भाज्यांद्वारे पोषक आहार कसा निर्माण करता येईल यासाठी संस्थेकडून असे वेगवेगळे प्रयत्न करण्यात येतात. अंगणवाडीतून मुलांच्या आहाराबाबत, जंकफूडच्या दुष्परिणामाबाबत मातांना मार्गदर्शन करण्यात येते.
रचना संस्थेद्वारे राबवण्यात आलेला दुसरा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे बाळकोपरा. इथे घराघरात बाळकोपरा आहे. या कोपऱयात चुरमुरे, गूळ, शेंगदाणे, खजूर, राजगिरा लाडू किंवा याशिवायचे असे पौष्टिक पदार्थ पारदर्शक बरणीत घालून बाळांच्या हाताला येतील असे ठेवले जातात. संस्थेकडून या परिसरातल्या पाचवी ते सातवीतल्या मुलांना एकत्र करून त्यांचा बालपोषण हक्क गट तयार केले गेले. ज्यात मुलांना वाढीचा तक्ता कसा बघायचा वजन कसं बघायचं, कुपोषित बाळांच्या मातांना कशी मदत करता येऊ शकते हे शिकवलं जातं. शासनाद्वारे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पोषण माह साजरा करण्यात आला. यात गावातील अंगणवाडी सेविका व आशा सेविकांना सामावून घेण्यात आलं होतं. मुलांना कोणता आहार द्यावा, त्यांना कोणत्या आहार घटकांची जास्त आवश्यकता असते. गर्भवती मातांना देण्यात येणारा आहार, त्यांच्या हिमोग्लोबिनच्या प्रमाणाबाबत जागरूकता असा विविध गोष्टींबाबत संस्थेद्वारे महिलांसाठी व मुलांसाठी पोषणजागृती करण्यात आली.
रचना संस्थेच्या कामाच्या परिसरात 2016-17 मध्ये 97 बालकं मध्यम कुपोषित असलेली आढळली होती. त्यातील 55 मुलं साधारण श्रेणीत आली. त्या बालकांच्या मातांबरोबर नियमित संवाद साधत त्यांना कुपोषणाच्या श्रेणी म्हणजे काय, त्या कशा बघायच्या, वजन- उंचीनुसार बाळ कुठल्या श्रेणीत आहे हे कसं ठरवायचं, हे शिकवलं गेलं. आता हे प्रमाण कमी झालं असून जास्तीतजास्त मुलांना योग्य पोषणाच्या गटात आणण्यात संस्थेला यश मिळत आहे. या अनुभवावर आधारीत जुन्नर तालुक्यातील 40 अंगणवाडय़ांमधील आदिवासी बाळांच्या पोषणासाठी आदिवासी मंत्रालयाच्या मदतीने काम सुरू झाले आहे. मुलांमधील कुपोषणाबाबत लोकसहभागातून सकारात्मकता आणण्याचं संस्थेचं काम प्रयोगशील असंच म्हणावं लागेल.
– [email protected]
– [email protected]





























































