आर्द्र चंद्रमा नभात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुजाता बाबर

चंद्रावर पाण्याचे रेणू असल्याचे हिंदुस्थानच्या पहिल्या चांद्रयान मोहिमेतून स्पष्ट झाले होते. त्यानंतर यातील संशोधनात अधिक प्रगती होत गेली आणि आता अमेरिकेतील नासाच्या संशोधनामुळे चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाचा नवा पुरावा मिळाला आहे. भावी अंतराळ मोहिमांसाठी चंद्रावरील या संशोधनाचा वापर आता करता येईल.

पाण्याच्या शोधात वणवण भटकणारे लोक आपण पाहिले आहेत. अवकाशातदेखील पाण्याच्या शोधार्थ अनेक दुर्बिणी आणि पृत्रिम उपग्रह भटकत असतात. पृथ्वीवर जीवनाचे अस्तित्व आहे ते केवळ पाण्यामुळे! समजा पृथ्वीवरचे सगळे पाणी अचानक नाहीसे झाले तर? बापरे! कल्पनेतसुद्धा हा विचार नकोसा वाटतो. याचमुळे अवकाशातही इतरत्र पुठे पाणी असेल का याचा शोध आपण गेली अनेक दशके घेत आहोत. यासाठी पृथ्वीला सर्वात जवळची वस्तू म्हणजे चंद्र! या शोधासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करतो आहोत. अनेक पृत्रिम उपग्रहांनी चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असावे यासाठी पूरक पुरावे आणले आहेत.

स्पुटनिक यानाच्या अवकाशझेपेनंतर आपल्या आकांक्षाही वाढल्या आणि आपण अवकाशात वस्ती करू शपू का या पुतूहलापोटी इतरत्र पाण्याचा शोध सुरू झाला. चंद्रावर अनेक मोहिमा गेल्या. चंद्राच्या ध्रुवीय पृष्ठभागावर बर्फ असण्याची शक्यता प्रथम पॅलटेक संशोधक केनेथ वॉटसन, ब्रूस सी. मुरे आणि हॅरिसन ब्राऊन यांनी 1968मध्ये वर्तविली होती. अपोलो यानामधून गेलेल्या अंतराळवीरांनी चंद्रावरील खडकांमध्ये पाण्याच्या प्रवाहाची चिन्हे शोधली होती. 2008मधील चांद्रखडकांच्या नमुन्यांच्या अभ्यासात ज्वालामुखीजन्य काचमण्यांमध्ये अडकलेल्या पाण्याच्या रेणूंचे पुरावे समोर आले. चंद्रावर पाणी आहे याचे पुरावे देणाऱया प्रमुख चांद्रमोहिमा अशा आहेत… यात इतर अनेक मोहिमादेखील आहेत.

इन्फ्रारेड किंवा अवरक्त खगोलशास्त्र हे महत्त्वाची भूमिका पार पाडते. जे इतर दुर्बिणी पाहू शकत नाहीत ते आपल्याला अवरक्त किरणांच्या साहाय्याने पाहता येते. याच प्रकारची स्ट्रटोस्फेरिक ऑब्जर्व्हेटरी फॉर इन्फ्रारेड अॅस्ट्रॉनॉमी म्हणजे अवरक्त खगोलशास्त्रासाठी स्ट्रटोस्फेरिक वेधशाळा नासातर्फे अवकाशात पाठविण्यात आली आहे. 27 ऑक्टोबर 2020 रोजी या वेधशाळेने चंद्रावरील प्रकाशमय म्हणजेच जिथे सूर्यप्रकाश पोहोचतो त्या भागात पाण्याच्या अस्तित्वाचे ठोस पुरावे सादर केले आहेत. यापूर्वी कायम सावलीत असणाऱया चंद्राच्या अंधारी पृष्ठाभागावर पाणी असल्याचे पुरावे सापडले होते. परंतु प्रकाशमय आणि दक्षिण भागातदेखील हे पुरावे सापडल्याने चंद्रावर पाणी निश्चित कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मुबलक प्रमाणात असू शकते अशी आशा पल्लवित झाली आहे. यामुळे अवकाशात इतर मोहिमांच्या सोयीकरिता चंद्र हा एक अवकाशातील ‘थांबा’ होऊ शकतो यावर दृढ विश्वास बसू लागला आहे.

सुरुवातीला चंद्र ही एक कोरडी अवकाशस्थ वस्तू आहे असे मानले जात होते. 1990मध्ये मात्र हा समज दूर झाला. नंतर 2009मध्ये चांद्रयान 1 या आपल्या मोहिमेने ठोस पुरावे सादर केले. तरीसुद्धा ते पाणी (प्2ध्) आहे किंवा हायड्रोक्झील समूहाप्रमाणे हायड्रोजन व ऑक्सिजनचा एक-एक रेणू आहे हे म्हणणे तसे कठीणच होते. मात्र सोफिया मोहिमेने पाण्याच्या रेणूचे अस्तित्व शोधल्याने चंद्रावर पाणी आहे हे निश्चित झाले. खगोलशास्त्राकरिता ही एक मोठी झेप आहे.

सोफिया ही संशोधनाकरिता सहाय्यक असलेली बोइंग 747 विमानावरील सुधारित प्रकाराची वेधशाळा आहे. ही वेधशाळा 45,000 फूट उंचीवर एक मोठी दुर्बिणी घेऊन जाण्यास सक्षम आहे. या उंचीमुळे अवकाश अत्यंत स्पष्ट स्वरूपात दिसते. या वेधशाळेची निर्मिती आणि देखरेख करण्यासाठी नासा आणि जर्मन एरोस्पेस सेंटर यांनी संयुक्तिकपणे काम केलेले आहे. सोफिया दुर्बिणीने 26 मे 2010 रोजी पहिला प्रकाश पाहिला. क्युपर एअरबोर्न वेधशाळेचा पुढचा टप्पा म्हणजे सोफिया वेधशाळा होय. रात्रभराच्या 10 तासांच्या उड्डाणादरम्यान ही वेधशाळा अवकाशातील चुंबकीय क्षेत्रे, ताऱयांच्या निर्मितीचे प्रदेश, धूमकेतू, तेजोमेघ आणि आकाशगंगेचे पेंद्र यांची निरीक्षणे करते. सोफिया वेधशाळेत 2.7 मीटरचा प्राथमिक आरसा असलेली दुर्बीण आहे. या दुर्बिणीद्वारे अवरक्त किरणांच्या माध्यमातून निरीक्षणे केली जातात.

सोफियाने चंद्राच्या दक्षिण गोलार्धात असलेल्या क्लॅव्हियस विवरामध्ये पाण्याचे रेणू शोधले. ओएच (ध्प्)पासून 6.1 मायक्रॉन ही पाण्याची विशिष्ट तरंगलांबी सांगण्यासाठी एक विशेष अवरक्त कॅमेरा वापरला गेला. मेरीलँडमधील नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमधील केसी हॉनिबल यांच्या नेतृत्वाखालील संशोधक पथकाचा असा विश्वास आहे की, पृष्ठभागावरील चंद्र काच किंवा कण पाण्याचे रेणू साठवतात.

अर्थातच हे सापडलेले पाणी जल स्वरूपात किंवा गोठलेल्या बर्फाच्या स्वरूपात नसून केवळ पाण्याच्या रेणूंच्या स्वरूपात सापडले आहे. ते इतके विखुरलेले आहेत की ते एकमेकांशी क्रिया करून जल किंवा बर्फ स्वरूपात निर्मिती करण्याच्या परिस्थितीत नाही. परंतु हे अस्तित्वदेखील आपल्याला अनेक संशोधनांच्या दिशांना नेऊ शकते. यामुळे चंद्रावर पाण्याचा मुबलक स्रोत सापडला तर चंद्र हा मानवी वस्तीसाठी किंवा इतरत्र जाणाऱया मानवी मोहिमांकरिता पाण्याचा स्रोत बनू शकेल किंवा यामधून श्वासाकरिता उपयुक्त ऑक्सिजन निर्मिती आणि रॉकेट इंधन निर्मिती होऊ शकेल. चंद्रावरील कायम अंधारी भागात गोठलेले पाणी असणारी असंख्य विवरे असू शकतात. यांना कोल्ड ट्रक असेही म्हणतात. चंद्रावर असलेल्या अब्जावधी सूक्ष्मविवरांमध्ये पाणी असण्याच्या संशोधनाला याने नवी दिशा मिळाली आहे.

नासाच्या जिम ब्रिडेन्स्टाईन यांच्या मते याला चंद्रावरील संसाधन मानायचे का असा प्रश्न आहेच! असे असले तरी चंद्राच्या संपूर्ण पृष्ठभागावर पाण्याचे अस्तित्व असल्याची सूचना या नव्या शोधाने दिली आहे. यामुळे चंद्रावर जाणाऱया भविष्यातील मानवी मोहिमांना याने मदत होणार आहे. खगोल संशोधकांना चंद्र जणू हाती गवसल्याचा आनंद नक्कीच मिळाला आहे!

चांद्रमोहीम पुरावे
1अपोलो 14 – 1971 – प्रथम थेट पुरावा – लँडिंग साईटजवळील चंद्राच्या पृष्ठभागावर मास स्पेक्ट्रोमीटर या उपकरणाद्वारे पाण्याच्या वाफेच्या रेणूंचे फवारे नोंदवले.
2 लुना 24 – 1978 -सोव्हिएत शास्त्रज्ञ एम. अखमानोवा, बी. डिमेण्ट’एव्ह आणि वर्नाडस्की इन्स्टिटय़ूट ऑफ जिओकेमिस्ट्री अँड अॅनालिटिकल केमिस्ट्रीचे एम. माकाxव्ह यांनी पाण्याचे प्रमाण निश्चितपणे शोधल्याचा दावा.
3 क्लेमेटाईन – 1994 – चंद्रावरील कायमची सावली असणाऱया किंवा अंधारी भागात पाण्याच्या बर्फाचा प्रस्तावित पुरावा.
4लुनार प्रॉस्पेक्टर–1998 – चंद्राच्या उत्तर व दक्षिण ध्रुवांवर मुबलक हायड्रोजन शोधला गेला आणि त्यामुळे कायमच्या सावलीत असणाऱया किंवा अंधारी विवरांमध्ये अडकलेल्या पाण्याचा बर्फ असावा असा अर्थ लावला गेला.
5 चँग 1 – 2007- चीनने पाठवलेल्या या मोहिमेने चंद्राच्या ध्रुवीय भागाचे प्रथम तपशीलवार पह्टो घेतले, जेथे बर्फाचे पाणी मिळण्याची शक्यता आहे.
6 चांद्रयान 1 – 2008 -चंद्रावर पाणी असल्याचा पहिला थेट पुरावा. इस्रोद्वारे पाठविलेल्या या मोहिमेचे हे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे.
7 लुनार रिका@नेसेंस – दक्षिण ध्रुवीय विवरातून टाकलेल्या साहित्यात ऑर्बिटर – 2009 हायड्रॉक्सिल समूहाचे मोठय़ा प्रमाणात अस्तित्व शोधले.
8सोफिया – 2020 स्ट्रटोस्फेरिक ऑब्जर्व्हेटरी फॉर इन्फ्रारेड अॅस्ट्रॉनॉमी या मोहिमेने चंद्रावरील सूर्यप्रकाश पडणाऱया भागात पाण्याच्या रेणूंचे अस्तित्व शोधले.
>> सुजाता बाबर
– [email protected]