लेखमाला क्र. 2 – ‘कपिलधारा तीर्थ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

नाशिक परिसरात ‘इगतपुरी-घोटी’दरम्यान ‘कावनाई’ गावी वसलेले ‘कपिलधारा तीर्थ’ पुराणोक्त संदर्भ लाभलेले अतिप्राचीन स्थान आहे. सांख्यशास्त्राचे जनक श्रीकपिलमुनी यांनी सह्याद्रीच्या अंतरंगात घनदाट वनश्रीने व्यापलेला हा शांतनिवांत, नितांतसुंदर व परमरमणीय असा परिसर वास्तव्याकरिता निवडला. आधुनिक विज्ञानाचा पाया ज्या शास्त्रावर बेतलेला आहे, त्या सांख्यशास्त्राची अभ्यासपूर्वक मांडणी श्रीकपिलमुनी यांनी याच ठिकाणी केली.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले अतिशय पुरातन आणि ‘स्वर्गाश्रम’ या गौरवशाली संबोधनाने परिचित असलेले ‘कपिलधारा तीर्थ’ सर्वसामान्य जनांना अधिक परिचित आहे ते येथे संपन्न होणाऱया ‘सिंहस्थ’ पुंभमेळ्यामुळे. नाशिक परिसरात ‘इगतपुरी-घोटी’दरम्यान ‘कावनाई’ गावी वसलेले ‘कपिलधारा तीर्थ’ पुराणोक्त संदर्भ लाभलेले अतिप्राचीन स्थान आहे. शिवपार्वती, नृसिंह, काळभैरव, कामाक्षीदेवी आदी स्वर्गस्थ देवता तसेच सत्य, द्वापार व कलियुगाला वंदनीय ठरलेले अगस्ती व कपिलमुनी, राम-लक्ष्मण-मारुती, ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, श्रीशिवराय, शेगावचे श्रीगजानन महाराज यांसारख्या अनेक ‘महा’पुरुषांचे वास्तव्य कपिलधारा तीर्थ परिसरास लाभलेले आहे.

या परिसराचे प्राचीनत्व पुढीलप्रमाणे आहे. भगवान विष्णूचे चोविसावे अवतार महर्षी कर्दम यांचे पुत्र, सांख्यशास्त्राचे जनक श्रीकपिलमुनी यांनी सह्याद्रीच्या अंतरंगात घनदाट वनश्रीने व्यापलेला हा शांतनिवांत, नितांतसुंदर व परमरमणीय असा परिसर वास्तव्याकरिता निवडला. आधुनिक विज्ञानाचा पाया ज्या शास्त्रावर बेतलेला आहे, त्या सांख्यशास्त्राची अभ्यासपूर्वक मांडणी श्रीकपिलमुनी यांनी याच ठिकाणी केली. ‘सृष्टीच्या निर्मितीचे मूळ स्वरूप व रहस्य उलगडले की, लौकिक दुःख व समस्या अतिसामान्य भासू लागतात. अज्ञान हे दुःख निर्मिती करणारे असून ज्ञान त्या दुःखांचा नाश करणारे आहे’ हे सांख्यशास्त्राचे मूळ तत्त्व होते. प्रपृतीला पुरुषतत्त्वाची जोड मिळाली की त्यातून उत्पत्ती, स्थिती व मोक्ष असे सातत्याने फिरणारे जीवनचक्र जन्माला येते. जगण्याला विवेकवृत्तीची जोड लाभली की, सजीव जन्ममृत्यूच्या फेऱयात पुन्हा अडकत नाही असे सांगणाऱया सांख्यशास्त्राची भाषा-परिभाषा कपिलधारा तीर्थ परिसरात बहरली आणि सर्वतोमुखी झाली.

श्रीकपिलमुनींनी मांडलेले तत्त्वज्ञान विश्वामध्ये प्रचलित आणि रूढ होण्याकरिता श्रीशंकराने ‘कपिल-माते’च्या मनात तत्त्वज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण केली तेव्हा, तिने आपल्या पुत्राला सांख्यशास्त्राचे तत्त्वज्ञान समजावून देण्यास सांगितले. श्रीकपिलमुनी यांनी सांख्यशास्त्राचा सिद्धांत व तत्त्वज्ञान मातेला ‘जीवन जगण्याचे सूत्र’ याअनुषंगाने साध्यासोप्या भाषेत उलगडून सांगितले. श्रीकपिलमुनींच्या सांख्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या अनेक जिज्ञासू, ज्ञानार्थी मंडळींकरिता या परिसरात सांख्य तत्त्वज्ञानाचे विद्यापीठ निर्माण करण्यात आले. अभ्यासार्थ्यांच्या निवासाची, भोजनाची व्यवस्था करण्यात आली. ही व्यवस्था कार्यान्वित होत असताना पाण्याचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा श्रीकपिलमुनींनी श्रीशंकराला विनंती करून गंगामातेस साकडे घातले. मुनींच्या या अलौकिक कार्याचे स्वरूप जाणून घेत गंगामाता साक्षात प्रकट झाली. गंगामातेच्या या उगमावर दगडी गोमुख स्थापन करण्यात आले. या गोमुखातून गोड, निर्मळ जलधारा अखंड प्रवाहित झाल्या आणि आजदेखील अविरत वाहणाऱया या जलस्रोताने परिसराला ‘कपिलधारा तीर्थ’ या नावाने तीर्थक्षेत्राची ओळख प्राप्त करुन दिली.

श्रीकपिलमुनींनी स्थापन केलेल्या सांख्य तत्त्वज्ञान विद्यापीठाची महती जगभरात पोहोचली. देशविदेशांतील अभ्यासक संख्याशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी कपिलधारा तीर्थास येते झाले. प्रख्यात चिनी संशोधक प्रवासी ह्यू एन त्संग याने विद्यापीठास भेट दिली व आपल्या येण्याची आठवण येथे नोंदली जावी म्हणून त्याने एक ‘घंटा’ प्रदान केली. त्या घंटेवरील मजपूर चिनी भाषेत असल्याचे सांगितले जाते.

श्रीकपिलमुनींच्या ज्ञानसामर्थ्याने प्रभावित झालेल्या त्यांच्या मातेने ‘‘जो पुणी या पुण्यभूमीत तपश्चर्या करेल त्यास उत्तम फल प्राप्त होईल. तसेच जो पुणी आपल्या मातेसाठी प्रार्थना करेल, त्याच्या मातेला मुक्ती लाभेल आणि स्वर्गप्राप्ती घडेल’’ असे आशीर्वचन देऊन आपल्या पुत्राकडे, श्रीकपिलमुनींकडे स्वतःस मुक्ती देण्याचा आग्रह धरला. श्रीकपिलमुनींनी अंगभूत तपश्चर्येच्या बळावर आपल्या मातेला सदेह मुक्ती दिली आणि स्वर्गस्थ केले म्हणून कपिलधारा आज ‘मातृमुक्ती स्थान’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. ‘‘येथे जो श्रद्धावान पुत्र आपल्या मातेसाठी पिंडदान तर्पण करतो, त्याच्या मातेस स्वर्गप्राप्ती घडते. तसेच या स्थानी जो आपली पुलदेवता, आराध्य दैवत आणि सद्गुरूंची मनोभावे उपासना करतो, त्याच्या इष्ट त्या सर्व मनोकामना पूर्ण होतात’’ असे स्पष्ट प्रतिपादन भगवान श्रीशंकराने केलेले आहे.

कपिलधारा तीर्थ परिसरात प्रभू रामचंद्राने सुतिक्षण मुनींच्या आग्रहाखातर वास्तव्य केले होते. अन्य एका प्रसंगामध्ये सीतामाईचा शोध घेणाऱया प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याच्या हेतूने पार्वतीमाता येथे सीतेचे रूप घेऊन अवतरली. मात्र, श्रीरामाने पार्वतीमातेचे मूळ रूप जाणले व तिला येथे कायमस्वरूपी वास्तव्य करण्याची विनंती केली म्हणून पार्वतीदेवी येथे श्रीकामाक्षी देवीच्या रूपाने स्थिर झाली. संजीवनी बुटी आणण्यास निघालेल्या हनुमंताची दिशाभूल करणाऱया कालनेमी राक्षसाला हनुमंताने ठार केले तो ‘कालनेमी’ परिसर आज नाम अपभ्रंशाने येथे ‘कावनाई’ नावाने प्रसिद्ध आहे. शिवकाळात कावनाई गावातील डोंगरावर नव्या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले. येथे श्रीशिवराय आणि समर्थ रामदास यांची भेट झाल्याचे पूर्वापार ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. मात्र इतिहासकालीन कागदपत्रांत त्याची नोंद नाही.

श्रीज्ञानेश्वरांनी आपल्या भावंडासह कपिलधारा तीर्थ परिसरात स्नान करून मार्तृस्मरणार्थ विधिवत तर्पण केले आणि पुढे चातुर्मासाचा काळ व्यतीत केल्याचे सांगण्यात येते. येथे हरिपाठ, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि सांप्रदायिक ग्रंथांचे पारायण करणारे भागवत सांप्रदायी पांडुरंगाच्या पृपेस पात्र होतील अशी धारणा आहे. शेगाव येथे जाण्यापूर्वी श्रीगजानन महाराजांनी कपिलधारा तीर्थानजीक बारा वर्षे तपश्चर्या केली होती. या पंपासरोवरक्षेत्री आज श्रीगजानन महाराजांचे स्मृतिस्थळ आणि शेगाव संस्थानची अधिपृत शाखा कार्यरत आहे.

[email protected]