छोट्याशा मदतीतून आनंद!

>> अभिज्ञा भावे (अभिनेत्री)

माझ्या सोसायटीत कुत्रे, मांजरं खूप आहेत. आम्ही सगळेचजण त्यांच्या खाण्या-पिण्याची काळजी घेतो. पण लॉकडाऊनच्या काळात कोणीच खालीदेखील उतरायचे नव्हते. मग आमच्या या मुक्या दोस्तांची थोडीशी जबाबदारी मीही उचलली.

लॉकडाऊन काळात अनेकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. अनेकांचे अतोनात हाल झाले. यात भटक्या मुक्या प्राण्यांचीही उपासमार झाली. कोरोना विषाणूमुळे लोकांना बाहेर पडणेच मुश्कील झाल्याने या प्राण्यांचे बऱयाच ठिकाणी हाल होताना पाहण्यात आले. अनेक संस्था त्यांच्या परीने या भटक्या प्राण्यांपर्यंत पोहोचतही होत्या. त्यात आपल्याला भूक लागली हे तोंडाने आपण सांगतो पण या मुक्या प्राण्यांना तेही सांगता येत नाही. त्यामुळे मुक्या प्राण्यांबद्दल मला फार काळजी वाटायची.

आमच्या कॉलनीत भटके पुत्रे आणि मांजरे आहेत. त्यांचं खाणं पिणं सगळं कॉलनीतील लोकच बघतात. पण त्यातला एक पुत्रा फार वयस्कर असून त्याला जखम होऊन त्यात किडे झाले होते. त्याला डॉक्टरकडे नेण्याची फार गरज होती. त्याची ती अवस्था मला बघवत नव्हती. अशावेळी त्याच्या उपचाराची जबाबदारी घेतली. खरंतर मलाही काही आर्थिक अडचणी होत्या. मला खूप तडजोड करावी लागली. त्यावेळी मला फक्त त्याची गरज माझ्या गरजेपेक्षा मोठी वाटली. त्यामुळे काही गोष्टी मॅनेज करून कराव्या लागल्या. पण एक मात्र नक्की की इच्छा असेल तिथे मार्ग सापडतो याचा चांगला प्रत्यय मला आला. तसे मला माझे मार्ग सापडत गेले. त्याच्यासाठी अॅम्ब्युलन्स बोलावली होती. मग त्याला पकडण्यापासून दवाखान्यात घेऊन जाण्यापासून त्याच्यावर योग्य उपचारही केले. त्याला होस्टेलरूममध्ये ठेवून औषधपाणी केले. पण आता त्याला पुन्हा तसेच झाले आहे. पुन्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार सुरू आहेत आणि तशीच एक मांजर होती तिची तीन-चार बाळंतपणं झाली आणि त्याच्यामुळे ती वारली. कारण खूप बाळंतपणं झाल्यावर त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. मग आमच्या कॉलनीतल्या दोन मांजरांची आम्ही नसबंदी करून घेतली.

शस्त्रक्रियेनंतर मांजरांचा सांभाळही केला. त्यांना पाच, सहा दिवस जपावे लागते. ती जागा नाजूक असते. पाऊस वगैरे असल्यामुळे त्यांना बाहेर जाऊ देणं शक्य नव्हतं. मग त्या दोन मांजरी मी पाच दिवस माझ्याकडे ठेवल्या. त्यांचं माझ्यापरीने जेवढे शक्य झालं तेवढं संगोपन केलं. त्यांचे औषध याकडे मी बारकाईने लक्ष देत होते.

शिवाय त्या भटक्या मांजरी असल्यामुळे त्यांना घरात राहण्याची सवय नव्हती. त्यामुळे त्यांना एकटं घरी ठेवणं सोयीचं नव्हतं. त्यामुळे सातत्याने त्यांच्याकडे लक्ष देत होते. मी संर्प्णू जग बदलू शकत नाही, पण जेव्हा जेव्हा मला शक्य असतं तेव्हा मी खारीचा वाटा घेऊन मदत करण्याचा प्रयत्न करत असते. आपल्यासमोर जे घडतंय त्यावर आपला पंट्रोल असायलाच हवा. त्याच अनुषंगाने मी ते केलं.

यादरम्यान मला ही गोष्ट कळली की पुठलंही नियोजन यशस्वी होण्यासाठी तुमची मेहनत ही आहेच पण त्याचबरोबर आजूबाजूची परिस्थिती पण आपल्या हातात असणे गरजेचे असते. ती आपण नियंत्रणात आणू शकत नाही. त्यामुळे माझ्या मनाची तयारी करून ठेवते. एखादे काम झाले तर उत्तम, नाही झाले तरी उत्तम. कदाचित दुसऱया दिवशी यापेक्षा चांगले काहीतरी असेल असे मला वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या