
>> स्पायडरमॅन
महिला दिनाचे औचित्य साधून गुगल इंडियातर्फे महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी 25 मिलियन डॉलर्स अर्थात 183 करोड रुपयांच्या देणगीची घोषणा करण्यात आली आहे. हे पैसे हिंदुस्थानसह जगातील विविध सेवाभावी संस्थांना अनुदान म्हणून देण्यात येणार आहेत. गुगल इंडियाचे सीईओ ‘सुंदर पिचई’ यांनी यासंदर्भात नुकत्याच व्हर्च्युअली आयोजित करण्यात आलेल्या ‘गुगल फॉर इंडिया’ या कार्यक्रमात घोषणा केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात महिलांची नोकरी गमावण्याची शक्यता दुपटीने वाढलेली आहे, तर दुसरीकडे जवळपास दोन करोड मुली या पुन्हा शाळेकडे फिरकण्याची शक्यता नाही अशी चिंतादेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे हिंदुस्थानातील ग्रामीण भागातील महिलांवर या अनुदानात जास्त लक्ष पेंद्रित केले जाणार आहे. ग्रामीण भागातील तब्बल 10 लाख महिलांना ‘इंटरनेट साथी’ कार्यक्रमाच्या अंतर्गत व्यावसायिक मार्गदर्शन, इंटरनेट टुल्स आणि सदस्यत्वाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.
व्हर्च्युअल प्रोग्रामअंतर्गत राबवल्या जाणाऱया या उपक्रमासाठी गुगलच्या मदतीने टाटा ट्रस्टदेखील कार्यरत असणार आहे. लोकांना ‘डिजिटल साक्षर’ बनवण्यासाठी या अभियानाची 2015 साली सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांत 80 हजार ‘इंटरनेट साथीं’च्या मदतीने पूर्ण हिंदुस्थानात तीन करोड महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आजच्या आणि उद्याच्या अशा दोन्ही तंत्रज्ञानाची ओळख महिलांना करून देणे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा ग्रामीण भागातील महिलांना मिळवून देणे हा यामागील प्रमुख उद्देश असल्याचे रतन टाटा यांनी सांगितले.
गुगलने ग्रामीण भागातील पृषी क्षेत्रात कार्यरत असणाऱया एक लाख महिलांना डिजिटल आणि आर्थिक साक्षर बनवण्याच्या मोहिमेसाठी नॅसकॉम फाऊंडेशनला अतिरिक्त असा 3.65 कोटी रुपयांचा निधी देण्याचीदेखील या वेळी घोषणा केली. याचबरोबर गुगलने एखाद्या छोटय़ा व्यवसायाचे स्वप्न पाहणाऱया महिलांच्या सशक्तीकरणासाठी ‘वूमन विल’ नावाचा वेब प्लॅटफॉर्मदेखील उपलब्ध करून दिला असून तो हिंदी व इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.





























































