मुंबईत पार पडला गोदरेज लिटरेचर लाइव्ह! मुंबई साहित्य महोत्सव 2026 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोदरेज लिटरेचर लाइव्ह! मुंबई लिटफेस्ट 2026 हा महोत्सव 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे पार पडला. यावर्षी या महोत्सवाचे 17 वे पर्व होते. गेल्या अनेक वर्षांपासून, या महोत्सवाने साहित्य आणि समकालीन संवाद साधण्यासाठी लेखक, विचारवंत, कलाकार आणि प्रेक्षकांना एकत्र आणले आहे. यंदाच्या साहित्य महोत्सवातही साहित्य, चित्रपट, पत्रकारिता, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, इतिहास, कला, क्रीडा , तंत्रज्ञान, पर्यावरण, ओळख आणि डिजिटल परिसंस्था या क्षेत्रांतील लेखक, कवी, वक्त्यांचा समावेश होता. अदिती मित्तल, अनुराग मायनस वर्मा, अयाज मेमन, बोरिया मजुमदार, सिरीयक बी फिलिप्स, फेय डिसोझा, गगन गिल, गुलजार, इर्विन सीली, जसप्रीत बिंद्रा, जावेद अख्तर, जेरी पिंटो, कश्मीर नवाज, पवन, पं. गुहा, रत्ना पाठक शाह, रिया चोप्रा, शांता गोखले, शशी थरूर, शेफाली शाह आणि सोनाली कुलकर्णी आदी नामवंतांनी या महोत्सवात सहभाग घेतला. ‘ग्रेट डिबेट’, ‘बुक इन फोकस’, आंतरराष्ट्रीय सादरीकरणे, कार्यशाळा, पुस्तक प्रकाशन आणि बुक एक्सेंज अशा आकर्षक उपक्रमांनी रसिक वाचकांना तीन दिवस मेजवानीच मिळाली. इंग्रजी साहित्यविश्वासोबतच प्रादेशीक भाषांमधील साहित्यही या महोत्सवात विशेष महत्त्वाचे ठरले.