लेख – शिवराय संचलन आणि लोकाधिकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेंद्र ठाकूर/वामन भोसले

शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे दरवर्षी शिवजयंतीनिमित्त शिवराय संचलनाचे आयोजन केले जाते. तथापि सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सामाजिक  सुरक्षिततेचे भान ठेवून आणि सर्व नियमांचे पालन करून या वर्षी संचलन न करता आज 31 मार्च 2021 रोजी छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्त…

महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे   शिवछत्रपती यांना मानवंदना देण्यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने मुंबई फोर्ट, नरीमन पॉइंट परिसरात भव्य संचलन गेली अनेक वर्षे आयोजित केले जात आहे. फोर्ट, हुतात्मा चौक, नरीमन पॉइंट हा मुंबईचा आर्थिक केंद्रबिंदू असलेला परिसर आहे. या विभागातील विविध आस्थापनांतील मराठी कर्मचाऱयांना, अधिकारी वर्गाला शिकरायांचे शौर्य आणि मराठी अस्मितेचे दर्शन घडावे, शिवरायांचे तेज झळाळून यावे आणि मराठी साहित्याच्या अविष्काराचे दर्शन व्हावे, लोकाधिकार समिती महासंघातर्फे 1978 पासून शिवराय संचलनाचे आयोजन केले जात असून महासंघाशी संलग्न असलेल्या सर्व समित्यांचे पदाधिकारी, कर्मचारी, शिवप्रेमी जनता मोठय़ा अभिमानाने आणि उत्साहाने हजारोंच्या संख्येने सहभागी होते.

दोन वर्षांपूर्की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पादचारी पूल कोसळला व त्यात काहींचे प्राण गेले. तेव्हा या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करून लोकाधिकार महासंघाने शिवराय संचलन रद्द केले होते. 2020 सालच्या मार्च महिन्यात कोरोना महामारीचा शिरकाव मुंबईसह महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्र शासनाच्या आवाहनानुसार आणि सामाजिक व आरोग्याचे भान लक्षात घेऊन शिवराय संचलन रद्द करून फक्त गेट वे ऑफ इंडियासमोरील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळय़ाजवळ महासंघाच्या पदाधिकाऱयांनी संघटित होऊन लोकाधिकार महासंघाचे अध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर, सरचिटणीस खासदार अनिल देसाई, कार्याध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली मानवंदना देण्यात आली होती. आता 2021 वर्षाच्या सुरुवातीस कोरोना महामारी आटोक्यात आली असे दिसत असतानाच फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाचे संकट गहिरे होत चालले आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभाग आणि मुंबई महानगरपालिका कोरोना नियंत्रणात आणण्याचे सर्वाधिक प्रयत्न करीत आहे. लसीकरणाच्या कामांनीदेखील वेग घेतला आहे, परंतु सर्वांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता या वर्षी लोकाधिकार समितीच्या वतीने भव्य शिवराय संचलनाचे आयोजन न करता शिवरायांना मानवंदना देण्यासाठी छोटेखानी कार्यक्रम सर्व नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे.

नोकरभरतीत मराठी माणसांना 80 टक्के प्राधान्य या ज्वलंत मागणीचा सातत्याने पाठपुरावा करणारी शिवसेनेची अंगीकृत संघटना स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाशी संलग्न असलेल्या विविध लोकाधिकार समित्यांमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठय़ा धूमधडाक्यात साजरी करण्यात येते. त्याचबरोबर या सर्व समित्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाशी संलग्न असून केवळ नोकरभरतीचीच नव्हे तर मराठी माणसांच्या बढती-बदलीकरती झालेल्या अन्यायाचे निकारण करण्याचे काम महासंघाच्या वतीने स्थापनेपासून करण्यात येत आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचे संवर्धन व संरक्षण करण्याचे कार्य महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्राची अंमलबजाकणी राज्यातील विविध आस्थापनांमध्ये होत आहे की नाही हे कटाक्षाने पाहिले जाते. इतकेच नव्हे तर आस्थापनातील कर्मचाऱयांना मराठी भाषेचे ज्ञान अवगत व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या पंधरवडय़ात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ म्हणून साजरा केला जातो. यासंबंधी विविध कार्यक्रम स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने आयोजित करण्यात येतात.

छत्रपती शिवाजी महाराज कुशल संघटक, सेनापती, द्रष्टे प्रशासक, बहुजनांचे नेते, गोरगरीबांचे आश्रयदाते होते. लोकहितदक्ष, कर्तव्यदक्ष,  स्वाभिमानी, सहिष्णू, चारित्र्यसंपन्न, आदर्श राज्यकर्ता असे जाणते राजे होते. इंग्रज गव्हर्नर लिहितो की, शिवाजी महाराज जर अजून दहा वर्षे जगले असते तर इंग्रजांना पूर्ण हिंदुस्थानचा नीट चेहरा पाहतासुद्धा आला नसता. सतराव्या शतकात लंडनमध्ये तीन कृत्तपत्रे प्रकाशित होत होती. त्यामध्ये ‘लंडन दि गॅझेट’ नावाचे वृत्तपत्र होते, शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याहून निसटले त्यावेळी या ‘लंडन दि गॅझेट’ मध्ये पहिल्या पानावरची बातमी छापून आलेली होती. त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘किंग ऑफ स्वराज्य’ असा नव्हता, ‘किंग ऑफ मराठा’ असाही नव्हता तर ‘शिवाजी द किंग ऑफ इंडिया’ असा होता.

छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, लोककल्याणकारी धोरणे, परकीय शक्तीला नामोहरम करण्याची क्षमता, कौशल्य, मुत्सद्देगिरी आणि शौर्य पाहता ते आधुनिक व्यवस्थापनाचे जनक आहेत असे म्हणावे लागेल. कोणतीही लढाई, तह, स्वराज्य विस्तारामधील त्यांचे नियोजन हे व्यवस्थापन शास्त्राला पूरक असेच होते. नेतृत्वगुण, रसद पुरविण्याची, आधुनिक तंत्रज्ञान, दळणकळणाचे व्यवस्थापन, स्वराज्य स्थापनेसाठी मंत्रिमंडळाची व सैन्यदलाची उभारणी याची अनेक उदाहरणे व्यवस्थापनशास्त्र शिकविताना दिली जातात. अनेक नामांकित व्यवस्थापन संस्थांनी त्यांच्या जीवन प्रसंगांना अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे.

अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात ‘शिवाजी द ग्रेट मॅनेजमेंट गुरू हा विषय शिकविला जातो. तसेच जगातील 112 राष्ट्रांत शिवरायांच्या गोरिला वॉर फेअर युद्धतंत्राचा वापर आपल्या अभ्यासात समाविष्ट करतात. अशा शिवरायांची शिकवण सतत आपल्या हृदयात राहावी, त्यांचा आदर्श कर्मचाऱयांच्या नसानसात भिनावा त्यासाठी त्यांची प्रतिभा विविध आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर  लावण्यात यावी अशी मागणी लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने करण्यात आली. त्यानुसार अनेक राष्ट्रीय उद्योगांच्या आस्थापनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. आस्थापनातील कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस नतमस्तक होऊन आपले दैनंदिन कामकाज सुरू करतात.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ ही शिखर संघटना असून या महासंघाशी महाराष्ट्रातील विविध आस्थापनांतील शेकडो समित्या संलग्न आहेत – यात किमा कंपन्या, तेल कंपन्या, हवाई कंपन्या, बँका, पोस्ट, रेल्वे, माझगाव डॉक, मुंबई पोर्ट ट्रस्ट, नेव्हल डॉक, अन्न महामंडळ, महानगर टेलिफोन निगम, बीएआरसी, टी.आय.एफ.आर, निटी, आयआयटी, समीर यासारख्या संशोधन संस्थांमध्ये आणि अदाणीसारख्या कंपन्यांमध्ये लोकाधिकार समितीची चळवळ असंख्य कार्यकर्त्यांच्या योगदानाने कार्यरत आहे.