लेख – तिसऱ्या महायुद्धासाठी चीनचे जैविक रणशिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> कर्नल अभय बा. पटवर्धन (निवृत्त)

जसे पहिल्या महायुद्धाला रासायनिक (केमिकल) आणि दुसऱयाला आण्विक (न्यूक्लियर) महायुद्ध म्हणून संबोधले जाते त्याचप्रमाणे चीन लढत असलेल्या तिसऱया महायुद्धाला जैविक/जननशास्त्र्ााrय (बायोलॉजिकल) महायुद्ध हे संबोधणे जास्त सयुक्तिक ठरेल. शत्रूवर सामरिक/व्यावहारिक वर्चस्व (गेन ऑफ फंक्शन) मिळविण्यासाठी लागणारी चीनची ही ब्रह्मास्त्र्ाs वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये विकसित केली जातात. याच ठिकाणाहून नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये कोविड कोरोना-19 चे विषाणू पहिल्यांदा जगात पसरायला सुरुवात झाली होती. याच प्रयोगशाळेत आता याच प्रकारच्या पण याहून जास्त वेगाने संक्रमित होणाऱया आणि हजारपटींनी प्रभावशाली (ट्रान्समिसेबल ऍण्ड लिथल) विषाणूनिर्मितींची शोधप्रक्रिया सुरू आहे.

चीन मागील नऊ वर्षांपासून कोरोना विषाणूसारख्या जैविक आणि जननशास्त्र्ााrय हत्यारांचा (बायोलॉजिकल ऍण्ड जिनेटिक वेपन्स) करून तिसरे महायुद्ध लढण्याची तयारी करतो आहे. 2003 मध्ये संपूर्ण चीनमध्ये ‘सार्स कोव्ह-2’ विषाणूंची लागण झाल्यानंतर हे युद्ध जिंकण्यासाठी पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) जैविक आणि जननशास्त्र्ा हत्यारांविषयी विचार करणे सुरू केले. पीएलएच्या या प्रकल्पावर संशोधन करताना 2009-10 मध्ये चीनमध्ये एक लाखावर लोक स्वाइन फ्लू प्रकोपाला बळी पडले, 2012 मध्ये 1850 लोक ‘मर्स’च्या मृत्युमुखी गेले, 2014/16 मध्ये ‘इबोला’ विषाणूंनी 10,970 चिन्यांचा घास घेतला.

अमेरिका, रशिया आणि पाश्चात्य राष्ट्रांच्या विरोधात जाऊन महायुद्ध जिंकण्यासाठी जैविक युद्ध हेच एक ब्रह्मास्त्र्ा (कोअर वेपन ऑफ व्हिक्टरी) आहे अशी चीनची धारणा आहे. त्यासाठी ही अस्त्र्ाs केव्हा व कशी सोडायची, त्यासाठी अनुकूल वातावरण कोणते असेल आणि शत्रूच्या आरोग्य व्यवस्था त्याचा आघात कितपत सहन करू शकेल याची खातरजमा चीनने आपल्या जैविक युद्धाभ्यासात केली आहे. या हत्यारांमधील विषाणू, शत्रूराष्ट्रांत रोगराई पसरवून आजवर झाला नाही असा नरसंहार कशी करतील याची चाचणी आणि खात्री पीएलएचे शास्त्र्ाज्ञ आणि आरोग्य अधिकाऱयांनी या युद्धाभ्यासाच्या माध्यमातून केली. चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे मर्मस्थान असलेल्या रासायनिक व जैविक प्रयोगशाळांवर फक्त ते सोडून चीनमधील दुसऱया कोणाचाच अंकुश नाही.

रानटी प्राण्यांच्या माध्यमातून संक्रमित होऊन मानवाला प्रताडित करणाऱया विषाणूबाधित रोगांवर संशोधन करण्यासाठी नॅशनल नॅचरल सायन्स फाऊंडेशन ऑफ चायनाने डॉक्टर शु जियांगवोच्या नेतृत्वाखाली 2012 मध्ये एक प्रकल्प सुरू केला. एका प्रवादानुसार ‘ए जायंट नेटवर्क ऑफ इन्फेक्शियस डिसिझ कंट्रोल इज टेकिंग शेप’ अशी शेखी 2019 च्या एका कॉन्फरन्समध्ये शु जियांगवोनी मारली होती. वुहानमधे कोविड-कोरोनाचा प्रकोप झाला असता त्यांच्या बातम्यांना याच महाशयांनी ब्लॉक/ डायल्युट केले होते. 2020 मध्ये त्यांनी सीपीसी पॉलिट ब्युरोला सादर केलेल्या अहवालातील ‘विषाणूबाधित रोगांवर संशोधन करताना मोठय़ा प्रमाणात अन्य जैविक विषाणूंचा शोध लावण्यात आम्हाला यश प्राप्त झाले आहे.’ या अर्थाच्या एका वाक्यामुळे इंटरनॅशनल व्हायरॉलॉजी कम्युनिटीत भूकंप आला.

आंतरराष्ट्रीय तज्ञांनुसार चीनने संक्रमक अनुवंशवाहक तंत्रज्ञानाचा (मेटॅजिनॉमिक्स टेक्नॉलॉजी) वापर करून कोविड-कोरोनासदृश चार नवीन अनुवंशवाहक जैविक विषाणू (पॅथोजन्स), दहा नवे रोगजंतू (बॅक्टेरिया) आणि 1640 विषाणू (व्हायरसेस) शोधून काढले-निर्माण केले आहेत. चिनी शास्त्र्ाज्ञ लष्करी अधिकारी वुहानच्या प्रयोगशाळांमध्ये मागील नऊ वर्षांपासून वटवाघुळ आणि जनावरांमधील रोगांमध्ये आढळणाऱया विषाणूंवर संशोधन करताहेत. जीवशास्त्रातील काळ्या गुप्त विवरातील संशोधनातून (एक्स्प्लोरेशन ऑफ डार्क मॅटर ऑफ बायोलॉजी) त्यांनी 143 नव्या रोग विषाणूंचा शोध लावला. चिनी पॉलिटब्युरोला सादर झालेल्या डॉक्टर ली मेंग यान यांच्या 7 मे 2021 च्या रिपोर्टनुसार जनरल डेंझोन्ग शीनी 2015 मध्ये पीएलए टेक्स्ट बुकमधे ‘प्रेडिक्ट वर्ल्ड वॉर थ्री ऍझ बायोलॉजिकल वॉर’ या शब्दांमध्ये या उपलब्धीचा उल्लेख केला आहे.

डॉक्टर शु जियांगवो यांचे सहकारी असलेल्या प्रोफेसर शींनी दक्षिण चीनमधील गुहांमध्ये असलेल्या वटवाघळांच्या रक्त व विष्ठsतून या विषाणू/रोगजंतूचा मागोवा घेऊन सांप्रत प्रचलित असलेल्या कोविड- कोरोना-19 विषाणूंचा खतरनाक भाईबंद असलेल्या ‘आरटीजी-13’ प्रजातीच्या विषाणूंची निर्मिती केली. प्रोफेसर शीं हे पीएलएचे सदस्य आहेत. ‘बायोलॉजिकल/जेनेटिकल ऍडव्हान्समेंट इज ए की एलिमेंट इन नेशन्स मार्च टुवर्ड्स ग्लोबल सुप्रीमसी’ या राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगच्या प्रख्यात प्रतिपादनानंतर पीएलएनी प्रोफेसर शींसारख्या अनेक शास्त्र्ाज्ञांना आपल्या अखत्यारीत कार्यरत केले आहे. वरिष्ठ चिनी सेनाधिकाऱयांनुसार कोविड-कोरोना विषाणू या नवीन जैविक हत्याराला मानवी रोगात बदलून न भूतो न भविष्यति असा नरसंहार शक्य होणार होता. (इट कॅन बी आर्टिफिशियली मॅनिप्युलेटेड इन टू ए ह्युमन डिसीझ व्हायरस, देन वेपनाइझ्ड ऍण्ड अनलीश्ड इन ए वे नेव्हर सीन बिफोर). पीएलए हे नव जैविक तंत्रज्ञान स्वसंरक्षण की आक्रमण करण्यासाठी वापरेल याची खात्री नसली तरी जैविक तंत्रज्ञान (बायो टेक्नॉलॉजी) पीएलएच्या भावी संक्रमित प्रछन्न युद्धाचा (हायब्रीड वॉरफेअर) अभिन्न व मूलभूत हिस्सा असेल यात कोणाही संरक्षणतज्ञाला शंका नाही.

तज्ञांनुसार तिसरे महायुद्ध चीन विषाणू हत्यारांनी लढेल. सर्वात पहिले चीन जगावर रोग विषाणूंचे गारुड टाकेल. त्यामुळे जगातील सामरिक/आर्थिक/सामाजिक चौकट खिळखिळी झाल्यावर तो सरतेशेवटी जगावर वर्चस्व स्थापन करेल/गाजवेल. या आधीच्या महायुद्धात आपल्याला विध्वंस, नरसंहार, मृत्यू आणि नंतरची भयाण स्मशानशांतता पाहायला मिळाली. प्रत्येक महायुद्धानंतर जगाला आर्थिक विवशता, जीवनोपयोगी सामान/संसाधनांची कमतरता, भूभाग हस्तांतरामुळे झालेली नवी राष्ट्रनिर्मिती आणि नवीन जागतिक ध्रुवीकरण यांना सामोरे जावे लागले. आज जगात हीच अवस्था/परिस्थिती निर्माण झालेली प्रत्ययाला येते. आजमितीला कोविड-कोरोना-19 मुळे जगभरात 15 कोटी 75 लाख 94 हजार लोक बाधित झाले असून 32 लाख 86 हजार मृत्युमुखी पडले आहेत. संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था चरमरीत झाली असून चीन त्याचा फायदा घेऊन मोठय़ा कंपन्या कवडीमोलाने गिळंकृत करतो आहे. जाणकार सूत्रांनुसार 1980 मध्ये जगासाठी आपली अर्थव्यवस्था खुली करून चीनने तिसऱया महायुद्धाची मुहूर्तमेढ रोवली होती.

तिसरे महायुद्ध चीन दारूगोळा, बॉम्ब व सैनिकांविना कोविड- 19 रोगाला कारणीभूत असलेल्या ‘सार्स कोव्ह-2’ विषाणूंच्या माध्यमातून लढेल. हे विषाणू शत्रूच्या शरीरातील पेशींवर कब्जा करत त्याच प्रजातीचे असंख्य विषाणू तयार करण्याच्या फॅक्टरीचे काम करतात (रॅपिडली मल्टिप्लाय आफ्टर इन्फेक्शन). सुरुवातीला हिंदुस्थान आणि उर्वरित जग हे युद्ध जिंकत असल्याचा आभास निर्माण झाला, पण लवकरच या विषाणूंनी एक नवी आघाडी उघडत नवनवे क्षेत्र काबीज करण्याचा सपाटा लावला. यापुढे हिंदुस्थान आणि उर्वरित जगाला या विषाणूंच्या तिसऱया लाटेची प्रतीक्षा आहे. विषाणूविरोधक लस, एकांतवास, एकमेकांपासून समयोचित दुरी, लोक संपर्क/व्यापारी व्यवहारावरील सापेक्ष सरकारी ताबा आणि मुखाच्छादन (मास्क) या अस्त्र्ाांनी आपण या विषाणूंशी लढा देऊ शकतो. लोकांना एकांतवास आणि मुखाच्छादना (मास्क) विषयी तिरस्कार वाटत असला तरी कोरोनाविरोधासाठी हे कोणत्याही सैनिकी चिलखतापेक्षा जास्त प्रभावशाली चिलखत आहे.