
मराठी भाषेच्या एकूणच भवितव्याविषयी महाराष्ट्रात तसे चिंतेचेच वातावरण आहे. त्याविषयी अनेकदा चर्चा, परिसंवाद होत असले, काळजी वगैरे व्यक्त होत असली तरी परिस्थितीत फार काय फरक पडलेला दिसत नाही. एका बाजूला इंग्र्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्यातच असे अंतर पडत असले तरी दुसऱया बाजूला मराठी भाषा आणि तिचा अभ्यास हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनविणारे, त्यासाठी आयुष्य वाहून घेणारे काही अभ्यासकही आहेत. डॉ. सुमन बेलवलकर हे नाव अशाच काही अभ्यासकांपैकी एक. अलीकडेच त्यांचे निधन झाले. त्यामुळे मराठी भाषेचा अभ्यास करणारे आणि मराठीची विविध अंगे उलगडून दाखविणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. मुळात भाषा विज्ञान ही अभ्यासाची शाखा अलीकडील काही वर्षांत निर्माण झाली आणि वाढीस लागली. युरोप, अमेरिकेत या विषयी गेल्या शतकातच जागृती झाली होती. त्याच्यामुळे भाषेकडे केवळ बोली म्हणून न पाहता एक शास्त्र्ा म्हणून पाहिजे जाऊ लागले होते. युरोप, अमेरिकेतील हा भाषेविषयी बदलेला दृष्टिकोन आपल्याकडे यायला अर्थातच आणखी काही दशकांचा काळ जावा लागला. गेल्या शतकाच्या पन्नाशीत महाराष्ट्रातही मराठी भाषेकडे भाषा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात झाली. या दृष्टिकोनातून मराठी भाषेचा अभ्यास विद्यापीठांच्या पातळीवर होऊ लागला. पुढील काळात अनेक मान्यवर विद्वान आणि अभ्यासकांनी या क्षेत्रात आपले योगदान दिले. मागील पिढीतील भाषा अभ्यासक डॉ. सुमन वासुदेव बेलवलकर यांनीही या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयातून त्यांनी 1960 च्या सुमारास भाषा विषयात एम.ए. ही पदवी संपादन केली. विद्यापीठात त्यांचा पहिला क्रमांक आल्याने त्या सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या होत्या. पुढे त्या पुण्यात वास्तव्याला आल्या. नंतरच्या काळात म्हैसूर येथील सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन लँग्वेजेस या संस्थेच्या डेक्कन महाविद्यालयात त्या रुजू झाल्या. या महाविद्यालयात असलेल्या पाश्चिमात्य विभागीय भाषा केंद्रात (वेस्टर्न रिजनल लँग्वेज सेंटर) अमराठी भाषकांना मराठीचे धडे देण्याचे काम सुमनताई करत होत्या. महाराष्ट्रात जरी मराठीची अवस्था बिकट होत असली तरी इतर प्रांतातील अनेक अमराठी अभ्यासकांना सुमनताईंमुळे मराठी भाषेची गोडी लागली. फक्त तेवढेच नव्हे तर मराठी भाषा शास्त्र्ााrयदृष्टय़ा त्यांनी आत्मसातही केली. या पद्धतीने सुमनताईंनी मराठीचे अनेक परभाषक विद्यार्थी घडविले. अशा विद्यार्थ्यांनी नंतर आपापल्या प्रांतात जाऊन मराठीच्या अभ्यासाचे आणि प्रसाराचे कार्य केले. हे सुमनताईंचे मराठी भाषेसाठी दिलेले मोठे योगदान म्हणता येईल. मराठी भाषकांच्या एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे मराठी भाषेचे संक्रमण कितपत होईल याविषयी शंका असलेल्या वातावरणात परभाषक अभ्यासांना मराठीची गोडी लावणे, मराठीचा शास्त्र्ााrय दृष्टिकोणातून अभ्यास करून त्यात पारंगत करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना त्यांच्या प्रांतात मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याची प्रेरणा देणे हे सोपे काम नक्कीच नव्हते. मात्र मराठी भाषेच्या गाढय़ा अभ्यासक असलेल्या सुमन बेलवलकर यांनी हे शिवधनुष्य एका ध्येयाने केले. भाषेची अभिव्यक्ती ही एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे संक्रमित होत असते. भाषेचा वसा आणि वारसा एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे सोपवला जात असतो. ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजेच ज्ञान आणि संस्कृती यांचे एकप्रकारे आदान-प्रदानच असते. अर्थात ही संपूर्ण प्रक्रिया एका विशिष्ट चौकटीत आणि विशिष्ट व्यवस्थेअंतर्गत जेव्हा होते तेव्हा त्याला भाषा विज्ञान किंवा भाषा अभ्यास म्हटले जाते. सुमनताईंना या गोष्टीची निश्चित जाणीव होती. त्यांच्या मराठीविषयक लेखनात, अध्यापनात आणि अभ्यासात ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. म्हैसूरच्या भाषा केंद्रातून प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झाल्या. तेथील या संपूर्ण काळात आणि नंतरही मराठी विषयक विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. त्याशिवाय व्याख्यान्यांच्या माध्यमातून मराठी भाषेची विविध अंगे वाचकांसमोर उलगडली. त्यांनी विजया चिटणीस यांच्यासह लिहिलेले ‘ऍन इन्टेन्सिव्ह कोर्स रिडर इन मराठी’ हे पुस्तक तसेच ‘मराठी जीवन छटा’, ‘मराठी शारदीयेच्या चंद्रकळा’ ही पुस्तके मराठी ही द्वितीय भाषा म्हणून शिकणाऱयांसाठी पाठय़पुस्तकेच ठरली. ‘बेलभाषा’ हे त्यांचे पुस्तक प्रचंड गाजले. याशिवाय ‘महाराष्ट्र भूमी, भाषा आणि साहित्य’ हे पुस्तक तसेच ‘लीळा चरित्रातील समाजदर्शन’ हा प्रबंध त्यांच्यातील साहित्यिक आणि अभ्यासक या दोन्ही गोष्टींची कल्पना देतो.




























































