देवाने मला खास काम देऊन गुजरातला पाठवले आहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम आदमी पक्षाचे संयोजक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज गुजरात दौऱयावर आहेत. यादरम्यान, राजेंद्र पाल गौतम यांच्याशी संबंधित वादाचे पोस्टर गुजरातमध्ये लावण्यात आले आहेत. तसेच गुजरातमध्ये अनेक ठिकाणी ‘अरविंद केजरीवाल हिंदूविरोधी’असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यावरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

गुजरातमध्ये येण्याचे ठरले असल्याने त्यांनी (भाजप) वेगवेगळय़ा ठिकाणी माझ्याविरोधात पोस्टर्स आणि होर्डिंग्ज लावले आहेत. हे लोक माझा तिरस्कार करतात. त्या पोस्टरवर देवाविरोधात अपशब्द लिहिले आहेत. तुम्ही देवाचा अपमान केला आहे. पोस्टर लावणारे लोक माझा द्वेष करण्यात इतके आंधळे झाले की, त्यांनी देवाविरुद्ध अपशब्द लिहिले. मी एक धार्मिक माणूस आहे. हनुमानजींचा कट्टर भक्त आहे. हनुमानजींची माझ्यावर असीम कृपा आहे. माझा जन्म श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी झाला. देवाने मला खास काम देऊन गुजरातला पाठवले आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.