केजरीवाल जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज जामिनासाठी सर्वेच्च न्यायालयात पोहोचले. 21 जून रोजी दिल्ली हायकोर्टाच्या सुटीकालीन खंडपीठाने ईडीच्या याचिकेवर सुनावणी पुर्ण होईपर्यंत केजरीवाल यांच्या जामिनावर स्थगिती आणली होती. दोन्ही पक्षांची बाजू ऐकूण घेतल्यानंतर 24 किंवा 25 जून रोजी याप्रकरणी निर्णय देण्यात येईल. तोपर्यंत जामिनावर स्थगिती असेल असे न्यायालयाने म्हटले होते.

20 जून रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास राऊस एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला होता. ईडीकडे केजरीवालांविरोधात कोणताही थेट पुरावा नाही असे कोर्टाने म्हटले होते. कोर्टाने 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. राऊस एव्हेन्यू कोर्टाविरोधात ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आम्हाला बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य नाही, असा युक्तिवाद ईडीचे वकील एसव्ही राजू यांनी केला. यानंतर हायकोर्टाने केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती दिली.