
देशाची राजधानीमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंबानीसह देशातील बडय़ा उद्योगपतींना ऑक्सिजन पुरविण्यासंदर्भात पत्र लिहून मागणी केली आहे.
दिल्लीतील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रिलायन्सचे इंडस्टीजचे मालक मुकेश अंबानी यांच्यासह देशातील बडय़ा उद्योगपतींना पत्र लिहिले आहे. अंबानी यांच्यासह टाटा, आदित्य बिर्ला, राहुल बजाज, आनंद महिंद्रा, हिंदुजा ब्रदर्स यांना त्यांनी पत्र लिहिले आहे.


























































