देशातील तपास यंत्रणा विनाकारण छापे टाकत आहेत -अशोक गेहलोत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्याविरोधात काँग्रेसकडून देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करत ईडीच्या कारवाईवर टीका केली आहे.

ईडी आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटावे, यासाठी आपण त्यांच्याकडे वेळ मागितला होता. त्यांनी आपल्याला वेळ दिला. मात्र नंतर काय झाले माहिती नाही, त्यांनी सांगितले की ते आपल्याला जयपूरला येऊन भेटतील. या आपल्या देशातील महत्त्वाच्या तपास यंत्रणा आहेत. त्या विनाकारण छापे टाकत आहेत, असे ट्विट गेहलोत यांनी केले आहे.

या तपास यंत्रणांना छापे टाकण्याची इच्छा नसते. मात्र, त्यांच्यावर गृह मंत्रालयाचा जास्त दबाव असतो, असा आरोपही गेहलोत यांनी केला. ही परिस्थिती गंभीर असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे या यंत्रणांची भेट घेण्यासाठी आपण आल्याचे गेहलोत यांनी सांगितले.