
सामना ऑनलाईन,मुंबई
पालिकेच्या नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आज महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, विरोधी पक्षनेते रवी राजा यांची भेट घेतली. राज्य शासनाकडून बुधवारी डॉ. जोशी यांची उत्पादन शुल्क आयुक्त पदावरून पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. डॉ. जोशी या भारतीय प्रशासकीय सेकेच्या 2006 बॅचच्या अधिकारी आहेत. सहाय्यक जिल्हाधिकारी – नागपूर, प्रकल्प अधिकारी – आदिकासी किकास प्रकल्प, अकोला, मुख्य कार्यकारी अधिकारी – भंडारा जिल्हा परिषद, अतिरिक्त जिल्हाधिकारी – मुंबई उपनगर जिल्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी – अकोला व सिंधुदुर्ग, शिधावाटप नियंत्रक आणि संचालक – नागरी पुरवठा, मुंबई तसेच ठाणे व मुंबई जिह्याच्या जिल्हाधिकारी अशा विविध पदांकर काम केले आहे.




























































