आसाममध्ये जायला मोदी पुन्हा घाबरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाममध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात वातावरण धगधगतेच आहे. याचा धसका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून आसाममध्ये सुरू होत असलेल्या खेलो इंंडिया युथ गेम्स या स्पर्धेच्या उद्घाटनाला जाणे टाळले आहे. समारंभाच्या आदल्या दिवशी गुरुवारी त्यांनी हा निर्णय घेतला. महिनाभरात त्यांनी दुसऱ्यांदाआसामचा दौरा रद्द केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसाममध्ये आले तर त्यांना येथील जनतेच्या संतापाला सामोरे जावे लागेल, असा इशारा ऑल आसाम स्टुडण्ट्स युनियन (आसू) व इतर संघटनांनी दिला होता. त्याचा धसका पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे.