
इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या 16 दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धाला रविवारी वेगळे वळण लागले. इस्रायलचा तोफगोळा चुकून इजिप्तच्या एका पोस्टवर पडला. त्यामुळे हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या रणगाडयातून निघालेला तोफगोळा इजिप्तच्या केरेम शॅलोम सीमेलगत असलेल्या ठिकाणावर पडल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने दिलगिरी व्यक्त केली आहे. दुसरीकडे लेबनॉनमधून हिजबुल्ला इस्रायलकर रॉकेट हल्ले करत आहे. ‘टाईम्स ऑफ इस्रायल’च्या कृत्तानुसार इस्रायलच्या कम्युनिकेशन टॉकरकर हल्ला करण्यात आला. त्याला इस्रायलनेही प्रत्युत्तर देत हिजबुल्लाचे तीन तळ उद्ध्वस्त केले.
हिंदुस्थानची पॅलेस्टाइनला मदत
हिंदुस्थानने पॅलेस्टिनींसाठी तब्बल 32 हजार किलोची जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवली तर साडेसहा हजार किलोंची वैद्यकीय मदत पाठवली आहे. ही मदतसामग्री गाझियाबादमधील हिंडन हवाई तळावरून सी-17 विमानांद्वारे पाठवण्यात आली. या मदतसामग्रीत आवश्यक औषधे, शस्त्रक्रिया उपकरणे, तंबू, पाणी शुद्धीकरण गोळय़ा यांसह इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत रविवारी 143 हिंदुस्थानींना सुखरूप परत आणण्यात आले. यात 2 नेपाळी आणि 4 अर्भकांचा समावेश आहे. दरम्यान, 4 नेपाळी विद्यार्थ्यांचे मृतदेहदेखील काठमांडू येथे आणण्यात आले.
इस्रायलचा वेस्ट बँकमध्ये मशिदीवर हल्ला
आज रविवारी इस्रायलने वेस्ट बँक येथील जेनिनच्या अल-अन्सार मशिदीवर हवाई हल्ला केला. या मशिदीत हमासचे दहशतवादी लपून बसल्याचा दावा इस्रायलने केला असून त्याबाबतचे फोटोही व्हायरल केले आहेत. इस्रायलने आज रविवारी सकाळी अलेप्पो आणि दमास्कसच्या विमानतळांवर पुन्हा हल्ला केल्याचा दावा सीरियाच्या वृत्तसंस्थेने केला आहे.































































