
प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासामध्ये भाद्रपद गणेश चतुर्थी उत्सव साजरा होत आहे. या अंतर्गत 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता सिद्धिविनायक मंदिरात महिलांसाठी ‘सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विनाशुल्क असून यात महिला भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन न्यासातर्फे करण्यात आले आहे.