दहशतीसाठी तरूणावर हल्ला करणारा फरारी अटकेत, स्वारगेट पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहशत निर्माण करण्यासाठी तरूणावर खुनी हल्ला करून दीड महिना फरार असलेल्या सराईताना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. साहिल कांबळे (रा. डायस्प्लॉट) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने डायस्प्लॉट भागात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तरूणावर प्राणघातक हल्ला केला होता.

तरूणावर खूनी हल्ला केल्याप्रकरणी फरारी आरोपीचा स्वारगेट पोलिसांकडून मागील दीड महिन्यांपासून तपास करण्यात येत होता. त्यावेळी आरोपी गुलटेकडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई ज्ञाना बडे, मनोज भोकरे, विजय कुंभार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी साहिल कांबळे याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने तरूणावर हल्ला केल्याची कबुली दिली. संबंधित आरोपी सिंहगड पोलीस ठाण्यातंर्गत एका गुन्ह्यात पाहिजे होता. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव एपीआय अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांच्या पथकाने केली.