गणपती विसर्जनावेळी चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

गणपती विसर्जनासाठी कुटुंबियांसोबत जात असलेल्या पाच वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करू पाहणाऱया महिलेला व्ही.पी. रोड पोलिसांनी अटक केली. रिंकू सहा असे अटक महिलेचे नाव आहे. तिला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार हा दक्षिण मुंबईत राहतो. त्याचा भुलेश्वर येथे दागिने बनवण्याचा व्यवसाय आहे. शनिवारी तो कुटुंबियांसोबत गणपती विसर्जनासाठी पहिली सुतार गल्ली येथे आला होता. त्यांच्यासोबत त्यांची पाच वर्षांची मुलगीदेखील होती. गणपती नेण्यासाठी त्या परिसरात प्रचंड गर्दी होती. गर्दीचा फायदा घेऊन रिंकूने मुलीला चॉकलेटचे आमिष देऊन जवळ बोलावले. रिंकू ही मुलीला घेऊन जात असल्याचे तक्रारदार याने पाहिले. हा प्रकार लक्षात येताच त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. काही वेळातच व्ही.पी. रोड पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी रिंकूला ताब्यात घेतले. तिच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला. रिंकू त्या मुलीला का पळवून नेत होती, याचा तपास पोलीस करत आहेत.