ऑडी ‘क्यू 5’ हिंदुस्थानात लाँच, जबरदस्त फीचरसह इतकी आहे किंमत…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑडीने ‘क्यू 5’ ही कार हिंदुस्थानात लाँच केली आहे. अवघ्या सहा सेकंदांत ही कार 100 किमीचा वेग पकडते हे तर हिचे वैशिष्टय़ आहेच, पण दोन लिटरचे टीएफएसआय इंजिन, 19 स्पीकर्स आणि त्रिमिती साउण्ड सिस्टम हेसुद्धा आकर्षण आहे. प्रीमियम प्लसची किंमत 58 लाख 93 हजार आणि टेक्नॉलॉजीची किंमत 63 लाख 77 हजार एवढी आहे. विशेष म्हणजे या कारमध्ये रिअर साइड एअरबॅग्जचाही समावेश आहे.