अफगाणिस्तानातून ऑस्ट्रेलियाचीही माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर्मनी, चीनसह अनेक देशांपाठोपाठ ऑस्ट्रेलियानेही अफगाणिस्तानमधून आपले सैन्य मागे घेतले आहे. हे सैन्य जवळपास 20 वर्षे अफगाणिस्तानमध्ये होते. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री पीटर डट्टन यांनी सैन्यवापसीची माहिती दिली. अफगाणिस्तानातील ‘खामा प्रेस’ या वृत्तसंस्थेने ‘स्काय न्यूज’च्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. तालिबानच्या वाढत्या दहशतीनंतर अनेक देश अफगाणिस्तान सोडत आहेत.

अफगाणिस्तानातील आमची लष्करी मोहीम अमेरिकेच्या समन्वयाने संपुष्टात आणली आहे, असे संरक्षण मंत्री डट्टन यांनी जाहीर केले आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील इतर कुठल्याही मोहिमेत आमचा सहभाग असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. अफगाणिस्तानमध्ये सध्या ऑस्ट्रेलियाचे केवळ 80 सैनिक होते. त्यांना काबूल येथील दूतावासाचे रक्षण तसेच मुत्सद्दी मोहिमेसाठी नेमण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाने एप्रिलमध्ये सर्व सैन्य मागे घेण्याची घोषणा केली होती. या देशाने 38 हजार सैन्य अफगाणिस्तानमध्ये तैनात केले होते. त्यातील 41 जवान शहीद झाले होते. हवाई सैन्यदलाने 2013 मध्ये अफगाणिस्तान सोडले होते. दरम्यान, रविवारी हिंदुस्थानने पंदहार येथून हिंदुस्थानी दूतावासातील आपल्या कर्मचाऱयांना सुरक्षितपणे बाहेर काढले. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील इतर कुठल्याही मोहिमेत आमचा सहभाग असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.