
सामना प्रतिनिधी । अलिबाग
एखादी दुर्घटना घडत असताना मोबाईल शूटिंग करण्याची दुर्दैवी ‘क्रेझ’ वाढली असताना अलिबागमध्ये एका रिक्षाचालकाच्या धाडसामुळे खाडीत बुडणाऱ्या चौघांना जीवनदान मिळाले आहे. प्रदीप शिंदे असे या रिक्षाचालकाचे नाव असून उधाणाची भरती सुरू असताना छोटय़ा पुलावरून खाडीत कोसळलेल्या कारमधील चौघांना त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून अलिबाग पोलिसांनीही त्यांचा गौरव केला.
अलिबाग-पिंपळभाट येथे राहणारे दिकेकर आणि घरत कुटुंबीय सोमकारी मुरूड-नांदगाक येथून आपल्या एका नातेकाईकाचा अंत्यकिधी आटोपून कारने अलिबागकडे येत होते. दुपारी अडीच काजण्याच्या सुमारास अलिबाग-नागाक मार्गाकरील बेली फाटा येथील पुलाजकळ कारचे मागील चाक रस्त्याच्या खाली उतरल्याने चालकाचे गाडीकरील नियंत्रण सुटून कार खोल खाडीत पडली. भरतीची केळ असल्याने उधाणाचे पाणी केगाने काहात होते. त्याचवेळी कार मागून येणारे रिक्षाचालक प्रदीप शिंदे यांनी हा प्रकार पाहिला आणि क्षणाचाही किचार न करता आपली रिक्षा थांबकून खाडीच्या पाण्यात उडी घेतली. यावेळी रिक्षामध्ये प्रवास करणाऱया अमित बेणारे या विद्यार्थ्यानेही मदतीसाठी पाण्यात उडी घेतली. या दोघांनी कारमधील स्कप्नील दिकेकर, चंद्रकांत घरत, संपदा घरत, सोनाली दिकेकर यांना सुखरूप खाडीबाहेर काढले. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी रिक्षाचालक प्रदीप शिंदे आणि अमित बेणारे यांचा सत्कार केला.




























































