
दुचाकी उत्पादक कंपनी बजाजने हिंदुस्थानात आपली नवीन बाईक Bajaj CT110X लॉन्च केली आहे. ही बाईक दिसायला खूप आकर्षक असून याची किंमतही कंपनीने कमी ठेवली आहे. आज आपण याच बाईकच्या फीचर्स आणि किंमतबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या CT110 आणि नवीन CT110X मध्ये अधिक पाहायला मिळत नाही. ही बाईक CT110X चौरस ट्यूब आणि इंटिग्रेटेड-डबल-क्रॅडल फ्रेमवर आधारित आहे. यात 115 सीसीचे डीटीएस-आय इंजिन देण्यात आले आहे. जे 7000 आरपीएमवर 8 बीएचपी पॉवर आणि 5,000 आरपीएमवर 10 एनएम टॉर्क जनरेट करते. गीअरबॉक्स म्हणून या बाईकमध्ये 4-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन देण्यात आले आहे.
किंमत
कंपनीने या बाईकची किंमत 55,494 रुपये इतकी ठेवली आहे. जी या बाईकच्या आधीच्या मॉडेलपेक्षा 1,612 रुपये महाग आहे.



























































