येत आहे नवीन Brezza, सनरूफ, नवीन इंटीरियरसह मिळणार जबरदस्त फीचर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मारुती सुझुकीने अलीकडेच आपली सेकेंड जनरेशन 2021 सेलेरियो हॅचबॅक हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. या हॅचबॅकची प्रारंभिक किंमत 4.99 लाख रुपये आहे. आता याच लाईनअप मध्ये कंपनी आपल्या XL6, Baleno, Alto, Ciaz आणि Ertiga MPV चे अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अशातच आता लवकरच मारुती आपल्या Vitara Brezza SUV चा अपडेट मॉडेल हिंदुस्थानात लॉन्च करणार आहे. सध्या कंपनी याची चाचणी करत असून पुढील वर्षी ही एसयूव्ही आपल्याला बाजारात आलेली पाहायला मिळू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीची अपडेट Brezza नवीन Heatect प्लॅटफॉर्मसह येणार आहे. Brezza 2022 च्या समोरील आणि मागील बाजूस अनेक कॉस्मेटिक बदल देखील पाहायला मिळू शकतात. विशेष म्हणजे नवीन ब्रेझ्झाचे इंटीरियर देखील पूर्णपणे नवीन असेल. एवढेच नाही तर 2022 च्या Brezza SUV मध्ये आम्ही अपडेटेड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील कंपनी देऊ शकते.

सनरूफ आवडणाऱ्या ग्राहकांना नवीन ब्रेझ्झा आवडेल. एका रिपोर्टनुसार, मारुती सुझुकी नवीन ब्रेझ्झामध्ये फॅक्टरी फिट इलेक्ट्रिक सनरूफ देखील देऊ शकते. मात्र हे फक्त याच्या टॉप मॉडलमध्येच कंपनी देणार, असे बोलले जात आहे. या सोबतच या नवीन एसयूव्हीमध्ये कनेक्टेड कार फीचर्स, वायरलेस चार्जिंग सिस्टीम, नवीन AC युनिट, पॉवर्ड ORVM, टॉप-एंड व्हेरियंटमध्ये 6 एअर बॅग यासारखे प्रीमियम फीचर्स कंपनी देऊ शकते.

इंजिन

कंपनी आपल्या नवीन ब्रेझ्झामध्ये 1.5L K15B पेट्रोल इंजिन देऊ शकते, असे बोलले जात आहे. जे 48V हायब्रिड सिस्टमसह येईल. हे इंजिन 138Nm टॉर्क आणि 103bhp पॉवर जनरेट करेल. कंपनी नवीन ब्रेझ्झा CNG प्रकारातही लॉन्च करू शकते.