
सामना ऑनलाईन । मुंबई
मार्व्हलचा अवेंजरचा चौथा भाग एंडगेमचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. डॅनियल आर पीके या हॉलिवूड लेखकाने 7 डिसेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होईल असे ट्विटरवर दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते.
आधीच्या अवेंजरच्या इनफ़िनिटी वॉरमध्ये थानोस हा खलनायक जिंकतो. थानोसविरोधातल्या युद्धात लोकी, हीमडॉल, स्कारलोट, व्हिजन, ब्लॅक पँथर, स्पायडर मॅन, डॉक्टर स्ट्रेंज, विंटर सोल्जर, स्कारलेट विच, द गार्डियन ऑफ द गॅलक्सी, निक फुरी हे सुपर हीरो मरण पावतात. त्यामुळे मार्व्हलच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. तसेच नव्या भागाबद्दल चांगलीच उत्सुकता होती.
नवीन ट्रेलरमध्ये सुरूवातीलाच आयर्न मॅन दाखवला आहे. त्यानंटर कॅप्टन अमेरिका आणि ब्लॅक विडोही या ट्रेलरमध्ये दाखवली आहे. शेवटी मार्व्हल चाहत्यांची प्रतिक्षा संपलेली असून एप्रिलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


























































