आयुष्यातील सुवर्णसंधी! नवी मालिका नवा नायक 

 >> गणेश आचवल

सध्या ‘झी मराठी’वर नवीन मालिका सुरू झाल्या आहेत आणि त्या मालिकांतून नवीन कलावंतही आपल्याला परिचित होऊ लागले आहेत. ‘36 गुणी जोडी’ मालिकेत ‘वेदांत’ ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणजे आयुष संजीव. या क्षेत्रातील आयुषचा प्रवास खूप रंजक आहे.

या मालिकेत मी साकारत असलेली व्यक्तिरेखा ही मला खूप समाधान देणारी आहे. कारण ‘वेदांत’ या व्यक्तिरेखेला खूप कंगोरे आहेत. तो खूप परफेक्शनिस्ट आहे. तो उद्धट आहे, पण मनाने वाईट नाही. त्याला काही गोष्टींचा फोबिया आहे. ही भूमिका करताना खूप मजा येते. कारण ही आजच्या पिढीची व्यक्तिरेखा आहे.

आयुष मुळात बदलापूरचा. त्याचे आजोबा हे हिंदी चित्रपटांचे सहाय्यक कलादिग्दर्शक होते. त्याच्या आईवडिलांनासुद्धा चित्रपटांची आवड आहे. चित्रपट या माध्यमाची आयुषला लहानपणापासून माहिती होती, पण अभिनय क्षेत्रात करीअर करणे हा विचार तेव्हा नव्हता. त्याच्या आईवडिलांनी त्याला डान्सच्या क्लासला घातलं आणि आयुष लहानपणापासून नृत्य करू लागला. शिवाय, तो क्रिकेटही उत्तम खेळत होता. बदलापूरला परेश शिरोडकर यांच्याकडून आयुषने नृत्य प्रशिक्षण घेतलं आणि शाळा,
कॉलेजमध्ये असतानाच तो इव्हेंटमध्ये नृत्य सादर करू लागला .

टायगर श्रॉफशी झालेली ओळख हा आयुषच्या आयुष्यातील टार्ंनग पॉइंट होता. टायगर श्रॉफ हा परेश सरांकडे प्रशिक्षणासाठी येत होता तेव्हा टायगर श्रॉफच्या ग्रुपशी परिचय झाल्याने आयुष जुहू येथे जिम्नॅस्टिक्स आणि मार्शल आर्टस् यांचेदेखील प्रशिक्षण घेऊ लागला. त्याने सीएचएम
कॉलेजमधून कॉमर्स शाखेत
ग्रॅज्युएशन केले. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात त्याने मुकाभिनय स्पर्धेत पारितोषिके मिळवली. 2018 साली आयुष अमेरिकेत बॉलीवूड डान्सिंगचे प्रशिक्षण देऊ लागला. तिथेच त्याचा परिचय थिएटरप्रेमी मित्रांशी झाला आणि मग तो अमेरिकेत सांगीतिकांचे सादरीकरण करू लागला. त्याने 2021 साली मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईत आल्या आल्या त्याचे इन्स्टाग्रामवरील फोटो आणि रील्स बघून त्याला एका मालिकेसाठी ऑडिशनला बोलावण्यात आले आणि त्या मालिकेची ऑडिशन त्याच्या जीवनात वेगळं वळण आणणारी ठरली. आयुषला ‘सोनी मराठी’वरील ‘बॉस माझी लाडाची’ ही मालिका मिळाली. या मालिकेनंतर आयुषला अनेक मालिकांसाठी विचारण्यात आले, पण त्याला चांगल्या आणि वेगळय़ा भूमिकेची अपेक्षा होती. ती संधी त्याला शशांक सोळंकी यांच्या ‘36 गुणी जोडी’ मालिकेमुळे मिळाली.

आगामी प्रोजेक्ट 

आयुष सध्याक्लिकया माईम प्लेमध्ये प्रमुख भूमिका करत असून या वर्षीच्याकालाघोडा फेस्टिव्हलमध्येदेखील त्याचा हा नाटय़ प्रयोग आहे. तसेच काही म्युझिक व्हिडीओमध्येदेखील तो काम करत आहे