
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बधाई हो, अंधाधुन असे हिट सिनेमा दिल्यानंतर यावर्षातील पुढला चित्रपट देण्यासाठी आयुष्यमान खुराना तयार झाला आहे. नुकताच आयुष्यमानने आपल्या ड्रीम गर्ल सिनेमाचे पोस्टर जारी केले आहे. यामध्ये स्त्री वेशात दिसणाऱ्या त्याच्या लूकची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
या पोस्टरमध्ये आयुष्यमान खुराना पहिल्यादाच साडीमध्ये दिसत आहे. तो अगदी जुन्या अशा एमईटी स्कूटरवर बसला आहे. त्याच्या चेहऱ्यावर तीनतेरा वाजल्याचं दिसत आहे. या भन्नाट लूकमुळे लोकांची उत्सुकता वाढली आहे.
As whacky as it can get! Here’s the first glimpse of my look in and as #DreamGirl. Thoughts?#DreamGirlFirstLook #DreamGirlFilmingBegins @ektaravikapoor @NushratBharucha @RuchikaaKapoor @writerraj @balajimotionpic pic.twitter.com/qyJib4U9Ao
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) December 3, 2018































































