राज्यमंत्री बच्चू कडू यांना मातृशोक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई बाबाराव कडू यांचे दीर्घ आजाराने 12 मार्च रोजी दुपारी 12 वाजता निधन झाले. मृत्युसमयी त्या 84 वर्षांच्या होत्या. शनिवारी त्यांनी चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा येथील राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला.

त्यांच्या पश्चात 6 मुले, 4 मुली, जावई, सुना व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर रविवारी 13 मार्च रोजी बेलोरा येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी प्रथमच राज्यमंत्री मंडळात शपथ घेतली त्यावेळी मातोश्री इंदिराबाई कडू या प्रामुख्याने उपस्थित होत्या. तसेच बच्चू कडू निवडणुकीच्या प्रचारात असताना त्या नेहमीच सोबत राहत होत्या.