बदलापूरच्या गर्डर कामासाठी 12 दिवस ब्लॉक

मध्य रेल्वेने बदलापूर स्थानकातील रोड ओव्हरब्रिजसाठी 18 स्टील गर्डर्सचे काम करण्यासाठी शनिवार, 22 नोव्हेंबरच्या रात्रीपासून पुढील 12 दिवस ब्लॉक जाहीर केला आहे. 3 डिसेंबरपर्यंत विशेष ट्रफिक आणि पॉवर ब्लॉक असेल. या कालावधीत मध्य रेल्वेची लोकल सेवा तसेच मेल-एक्प्रेसच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. तसेच रविवारी ठाणे ते कल्याणदरम्यान जलद मार्गावरील लोकल सेवा धिम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत.