बदलापूर घटनेत नवा ट्विस्ट, निलंबित पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची मुंबईत बदली

बदलापूर अत्याचार प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे-शिंदे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या बदलीसाठी पात्र अधिकाऱयांची यादी मागवण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्यातील 22 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई पोलीस दलात 14 अधिकाऱयांची बदली करण्यात आली आहे. बदलापूर येथील पोलीस ठाण्यातील निलंबीत पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे-शिंदे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे. याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या तीन अधिकाऱयांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली सरवदे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे. ठाणे शहर येथील अजय आपळे, नंदकुमार पैचे, गंगाराम वळवी महादेव कुंभार  पेटकर, अशोक भगत, चंद्रहार गोडसे, अनिल पडवळ, अनिल जगताप, संदीप धांडे, अतुल अडुरकर तर नवी मुंबईतील विजयकुमार पन्हाळे व संजीव धुमाळ यांची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.