
वांद्रे पश्चिम येथील जॉगर्स पार्कमध्ये विशेष मुलांसाठी अत्याधुनिक खेळण्यांसह व्यायामाची सुविधा असलेले मुंबईतील पहिलेच उद्यान विकसित करण्यात आले आहे. पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या विशेष मुलांच्या उद्यानाचे लोकार्पण शिकसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबईत पालिकेच्या माध्यमातून उद्याने-क्रीडांगणांचा कायापालट करण्यात येत आहे. यामध्ये वांद्रेमध्ये सी-फेस असणाऱ्या जॉगर्स पार्कचा विकास खास विशेष मुलांसाठी करण्यात आला आहे. ‘आय लव्ह मुंबई’ संस्थेच्या सहकार्याने आणि पालिकेच्या परवानगीने या उद्यानाचा विकास करण्यात आला आहे. सुमारे 9000 चौरस फुटांकर साकारलेल्या या उद्यानात 32 प्रकारच्या विविध सुविधा करण्यात आल्या आहेत. यामध्ये व्हीलचेअरही फिरवता येणार आहे. शिवाय खेळण्यांसह प्ले बोर्डचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
अशा सुविधा असणार
- एआरसी बॉल
- हँड मुव्हर
- स्लायडर
- व्हील चेअर
- राऊंड टेबल
- व्हील चेअर स्किंग
- मंकी क्लिंबर
- नेट स्किंग
- शोल्डर ट्वर्ल
- शोल्डर बिल्डर





















































