मोदींच्या मंत्र्याने अकलेचे ‘किंगफिशर’ उडवले, म्हणाला विजय मल्ल्यासारखे स्मार्ट बना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
मल्ल्याची बायको पिंकी लालवानी वर्षाला 1.35 कोटी रुपये कमावते असा दावाही त्याने केलाय

सामना ऑनलाईन, हैदराबाद

९ हजार कोटींचा हिंदुस्थानला चुना लावत विदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्यामुळे मोदी सरकारवर आधीच नामुष्कीची वेळ आली आहे. त्यातच मोदी सरकारमधील एका मंत्र्याने विजय मल्ल्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत स्मार्ट बना असा सल्ला भोळ्या भाबड्या आदिवासींना दिला आहे. जुएल ओराम असं या मंत्र्याचं नाव असून ते केंद्रातील आदिवासी विकासमंत्री आहेत.

उरांव भागामध्ये आदिवासींसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना ओराम म्हणाले की ‘मल्ल्याने कितीही वाईट कामे केलेली असतो, त्याने सगळ्यात आधी त्याचा उद्योग यशस्वी करून दाखवला. त्याच्या सफलतेपासून प्रेरणा घेण्यासारखी आहे. विजय मल्ल्या हा एक स्मार्ट माणूस आहे. त्याने आपल्याकडे बुद्धीमान माणसे नोकरीला ठेवली आणि नंतर बँका, सरकार आणि राजकारण्यांवर आपला प्रभाव पाडला. तुम्हाला हे सगळं करण्यापासून कोणी रोखलं आहे.’

आदिवासी असल्याचं फायदे सांगताना ओराम म्हणाले की आदिवासींना शिक्षण संस्था, सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे. सगळे आदिवासी याचा फायदा उचलू शकतात. संधी मिळवण्यासाठी आपल्याला स्मार्ट बनावं लागेल, उद्योजक बनावं लागेल, माहिती मिळवावी लागेल आणि तीच आपली ताकद असेल असं ओराम यांचं म्हणणं आहे.