
बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पीएसआय लक्ष्मण कीर्तने सहकर्मचारी रणजित पवार या दोघांना 28 हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यापुर्वी देखील दोन कर्मचारी लाचेच्या जाळयात अडकले आहेत. मंगळवार दि. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी पीएसआय लक्ष्मण कीर्तने आणि शिपाई रणजित पवार या दोघांनी एका प्रकरणात 28 हजार रुपयांची लाच मागितली होती.याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी या दोघांना लाच घेतांना रंगेहाथ पकडले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

































































