भयानक! पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी 120 व्होल्टचा झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

देश-विदेशात लग्नाशी निगडीत वेगवेगळ्या प्रथा-परंपरा बघायला, ऐकायला किंवा वाचायला मिळतात. हिंदुस्थानातही अशा अनेक परंपरा आहेत ज्यातील काही या अत्यंत भयानक आहे. आपल्या देशामध्ये काही भागात लग्नापूर्वी तरुणींना कौमार्य चाचणीला सामोरे जाण्याची जबरदस्ती केली जाते. काही देश असे आहेत जिथे तरुणींना नाही तर तरुणांना भयंकर रुढी परंपरा पाळाव्या लागतात. या देशांमध्ये पुरुषांना लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी पौरुषत्वाचा पुरावा द्यावा लागतो.

पाश्चिमात्य देशांमध्ये अनेक ठिकाणी मुलींच्या लग्नासाठी स्वयंवराचे आयोजन करण्यात येते. यावेळी स्वयंवरासाठी येणाऱ्या इच्छुक नवरदेवांना पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षाच द्यावी लागते. स्वयंवरासाठी आलेल्या उमेदवारांना आधी पिण्यासाठी दारू दिली जाते आणि नंतर त्यांना 120 व्होल्टचा झटका दिला जातो. हा झटक्याला जो उमेदवार सहन करू शकेल त्यालाच ‘खरा मर्द’ मानले जाते आणि त्याच्यासोबत मुलगी लग्न करते.