पहिलीत असताना ओरडलेली शिक्षिका, तीस वर्षांनी विद्यार्थ्याने घेतला निर्घृणपणे बदला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षिकेने पहिलीत असताना सर्व वर्गासमो ओरडले याचा राग एका विद्यार्थ्याने तीस वर्षे मनात ठेवला. दोन वर्षा पूर्वी जेव्हा ती शिक्षिका त्याच्या समोर आली. त्याचा तो राग उफाळून आला व त्याने तिची सुरा खुपसून निर्घृण हत्या केली. त्याने तिच्या शरीरावर 101 वार केले.

नोव्हेंबर 2020 मध्ये ही घटना बेल्जीयम मध्ये घडली होती. मारिया वेरलींडेन असे त्या शिक्षिकेचे नाव असून तो 59 वर्षांची होती. तर गुंटेर उनव्हेंट असे त्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. गुंटेर हा सात वर्षांचा असताना शाळेत त्याला मारिया ओरडल्या होत्या.

गुंटेरने मारिया यांच्या घरी जाऊन त्यांची हत्या केली होती. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला होता. पोलीस मारिया यांच्या मरेकर्यांचा शोध घेत होती. घटनेला दोन वर्ष झाल्यानंतर गुंटेरने त्याच्या एका मित्राकडे त्याचा गुन्हा कबूल केला. त्या मित्राने पोलिसांना त्याबाबत कळवलं. पोलिसांनी तत्काळ गुंटेरला अटक केली.