पिस्ता खाल तर निरोगी राहाल, वाचा

आपल्याला रोजच्या धावपळीत तग धरण्यासाठी उर्जा ही फार गरजेची असते. सुक्या मेव्यातील पिस्ता हा उर्जावाढीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आपल्याला दररोज उर्जेने परिपूर्ण राहणे हे गरजेचे असते. याकरता शरीराला आंतरीक मजबूती गरजेची असते. याकरता आहारात सुकामेवा समाविष्ट करायला हवा. विशेषतः पिस्ता हा अनेक आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. पिस्ता शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या व्हिटॅमिनची कमतरता दूर करण्यास देखील मदत करतो.

पिस्ता योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ला गेला तर ते थकवा, कमकुवत प्रतिकारशक्ती आणि अगदी मूड स्विंग्ससारख्या समस्यांवर मात करण्यास मदत करू शकते. पिस्ता हे व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट स्रोत आहे. विशेषतः व्हिटॅमिन बी 6 मज्जासंस्था मजबूत करते, हार्मोन्स संतुलित करते आणि हिमोग्लोबिनच्या निर्मितीस मदत करते.

एक महिना बीटाचा रस पिल्याने मिळतील हे फायदे, वाचा

पचनशक्ती वाढवायची असेल आणि दिवसभर उत्साही राहायचे असेल, तर सकाळी 5 भिजवलेले पिस्ता खाणे फायदेशीर आहे.

पिस्ता कसा खावा?

रात्रभर पिस्ता भिजवून सकाळी खाणे अधिक फायदेशीर आहे.

पिस्त्यामुळे पचन उत्तम होते. तसेच यामुळे शरीर पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास सक्षम होते.

रात्री गरम दुधात 3-4 पिस्ता घालून प्यायल्याने चांगली झोप येते आणि मनाला आराम मिळतो.

आपल्या आरोग्यासाठी जवस खाणे का हितावह आहे, वाचा

पिस्ता हा केवळ चवीसाठी खाऊ नका. तर पिस्ता हा पौष्टिकतेचे एक उत्तम भांडार आहे. तुमच्यामध्ये व्हिटॅमिन बी-6 ची कमतरता असेल तर आहारात पिस्त्याचा समावेश नक्कीच करा.