
पश्चिम बंगालमधील बिधाननगरच्या स्पेशल कोर्टाने केंद्रीय गृह मंत्री अमित शहांना 22 फेब्रुकारीला सुनावणीस हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. तृणमूल कॉँग्रेसचे नेते खासदार अभिषेक बॅनर्जींच्या मानहानी प्रकरणात हा शहा यांना समन्स पाठविण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये काढण्यात आलेल्या एका रॅलीदरम्यान भाजप नेते अमित शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक यांच्यावर जोरदार हल्ला चढवत भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. याप्रकरणी अभिषेक बॅनर्जी यांनी शहा यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणात स्पेशल कोर्टाने शहा यांना समन्स बजावत 22 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्कतŠ हजर रहा किंका आपला ककील पाठका, असे या समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.
प्रकरण काय?
पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांनी अनेकदा अभिषेक बॅनर्जींकरून ममतांकर निशाणा साधाला आहे. ममतांकर घरणेशाहीचा आरोप करण्यापासून अभिषेक यांच्याकर खंडणीखोरीचा आरोप करत टीका करण्यात आली आहे. तोलाबाज भाईपो म्हणजे खंडणीखोर भाचा अशा अर्थाचा टोला भाजप नेत्यांकडून अनेकदा लगाकला जातो. याप्रकरणी अभिषेक बॅनर्जी यांनी मानहानीचा दावा दाखल करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच थेट आव्हान दिले आहे.




























































