IPL 2020 – आयपीएलमधील ‘अविश्वसनीय’ झेल, खेळाडूंची चपळता पाहून व्हाल अवाक

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा 13 वा हंगाम सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी बाकी आहे. जगभरातील दिग्गज खेळाडू आयपीएल ट्रॉफीसाठी झुंजताना दिसतील. गेल्या हंगामात चेन्नई विरुद्ध खेळताना मुंबईच्या किरोन पोलार्ड याने सीमारेषेवर एका हाताने झेल घेतलं सामन्याचे चित्र पालटवले होते. आज आयपीएल मधील अशाच ‘सुपर कॅच’ची चर्चा करणार आहोत.

1.

screenshot_2020-09-13-15-08-16-186_com-android-chrome

आयपीएलच्या 10 व्या हंगामात ग्रुप स्टेजला दिल्ली डेअरडेव्हील्सच्या विरुद्ध बेन स्टोक्सने मोहम्मद शमीचा अफलातून झेल घेतला होता.

IPL 2020 – आयपीएलमध्ये सर्वात जास्त संघाकडून खेळलेले 6 खेळाडू, एकाने तर 8 संघ बदलले

2.

screenshot_2020-09-13-15-08-11-427_com-android-chrome

आयपीएल 2015 मध्ये राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शेण वॉटसन याचा सीमापार जाणारा फटका ड्वेन ब्रावो उंच उडी घेत एका हाताने झेलला.

Photo story – आयपीएलमध्ये एकही चौकार न मारता अर्धशतक ठोकणारे 5 खेळाडू

3.

screenshot_2020-09-13-15-08-07-218_com-android-chrome

आयपीएल 2013 मध्ये रॉस टेलरने फटकवलेला चेंडू सीमारेषेवर गुरकीरत सिंह मान याने हवेत सूर मारत टिपला होता.

IPL 2020 – चेन्नई चौथ्यांदा ‘किंग’ होणार? ‘या’ दोन महत्त्वाच्या खेळाडूंची उणीव भासणार

4.

screenshot_2020-09-13-15-08-02-951_com-android-chrome

केकेआर आणि गुजरात लायन्स संघात झालेल्या लढतीत स्मिथच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादव याने स्लिपच्या वरतून चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे सुरेश रैना भिंतीसारखा उभा होता आणि त्याने डावीकडे झेप घेत एका हाताने झेल पकडला.

5.

screenshot_2020-09-13-15-07-58-141_com-android-chrome

मैदानात कोणत्याही कोपऱ्यात चेंडू भिरकवणारा एबी. डिव्हीलिअर्स एक चपळ फिल्डर आहे. मुंबईच्या अंबाती रायडू याचा सीमारेषेवर एबीने जबरदस्त झेल घेत आयपीएलमधील ‘सुपर कॅच’मध्ये स्थान मिळवले.

IPL 2020 – आरसीबी समोर विजेतेपदाचे ‘विराट’ चॅलेंज, असा आहे बंगळुरूचा संघ

6.

screenshot_2020-09-13-15-07-52-052_com-android-chrome

ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस लेन याने आयपीएल 2014 ला सीमारेषेवर डिव्हीलिअर्सचा अविश्वसनीय झेल घेतला. आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम झेलपैकी तो एक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या